Uncategorized

अंबाबरवा अभयारण्यात वाघोबांचे धुमशान; दोन दिवसात आठ वाघांचे दर्शन, पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण..

दोन दिवस वाघोबाच्या दर्शन दिले ; यामुळे पर्यटकांना आकर्षित करत आहेत .

 

युवा महाराष्ट्र11 न्युज

प्रतिनिधी- (प्रभुदास पारस्कार, )

संग्रामपूर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेच्या कुशीत वसलेले आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भाग असलेले अंबाबरवा अभयारण्य सध्या वाघांच्या दर्शनाने गजबजले आहे. शनिवारी दुपारच्या सफारीत पाच पट्टेदार वाघ एकाच वेळी दिसल्यानंतर आता सोमवारी 09 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रातील जंगल सफारीत आणखी तीन वाघांचे दर्शन पर्यटकांना घडले आहे. त्यामुळे अवघ्या दोन दिवसात आठ वाघ दिसल्याने अंबाबरवा अभयारण्याची श्रीमंती चांगलीच वाढली आहे.
सोमवारी सकाळी वाघाच्या कुटुंबाचे दर्शन जंगल सफारीदरम्यान खामगाव येथील पर्यटक राजेश अरबट, मोहन अरबट आणि डॉ. रोहिणी अरबट यांच्या सोबतीला आलेल्या पर्यटकांना निसर्गाने भरभरून दर्शन दिले. त्यांना वाघ,वाघीण आणि एक बछडा (छावा) अशा वाघाच्या संपूर्ण कुटुंबाचे मनमोहक दर्शन घडले. वाघोबांसोबतच मोराचा थवा, रानगवा, सांबर, तसेच विविध दुर्मिळ पक्षी आणि सातपुड्याचे विहंगम निसर्गसौंदर्य अनुभवण्याची पर्वणीही या पर्यटकांना लाभली.
यापूर्वी 07 ऑक्टोंबर शनिवारी दुपारी 03 वाजताच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर, पुणे, चिखली, जळगाव जामोद येथील पर्यटकांना वसाली येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज जंगल सफारी गेटपासून पाटा पाणी भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका पाणवठ्यावर पाच वाघ एकाच वेळी दिसले होते. ही घटना अभयारण्याच्या इतिहासात पहिलीच मानली जात आहे.                                     09ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सत्रातील जंगल सफारी दरम्यान पर्यटक श्री. मोहन अरबट , श्री.रजेश अरबट , डॉ . रोहीणी अरबट व इतर त्यांच्या मदतीला गाईड- अशोक पालकर , कृष्णा डावर , जिप्सी चालक -रामा डावर रिच्छू कनाशा यांच्या मदतीने जंगल सफारीचा आनंद घेतला .

पर्यटक :- डॉ. रोहिणी अरबट खामगाव 
आम्ही 09 ऑक्टोंबर सोनवार रोजी अंबाबरवा अभयारण्य येथे पिकनीकला आलो, आणि जंगल सफारीचा आनंद घेतला तर आम्हाला 3वाघ दिसले, त्यात एक वाघ, एक वाघीण व छावा ! खुप खतरनाक अनुभव आला .विलक्षण अनुभव कॅमेरात कॅप्चर केले आहे. येथे येणे अगदी सार्थकी ठरले. आमचा अनुभव एकदम छान झाला आहे. मनात एक ध्यास घेतला कि वर्षातून एकदा येथे येणे झालच पाहिजे , इथे आम्हाला सांबर, मोरे, गवा, सांबर इतर दुर्मिळ पक्षी सु‌द्धा दिसले.

वन विभागाकडून दुजोरा
याबाबत सोनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) श्री.अजय बावणे
“अंबाबरवा अभयारण्यात सध्या वन्यप्राण्यांचे प्रमाण चांगले वाढले आहे. पर्यटकांना वाघासह इतर वन्यजीव हमखास दिसत आहेत. हा मेळघाट आणि अंबाबरवा अभयारण्य संवर्धनाचे यश आहे.” यामुळे पर्यटकांसाठी अंबाबरवा अभयारण्याचे उत्तम ठिकाण म्हणून नावलौकिक मिळवला आहे निसर्ग सौंदर्य ,वन्य प्राण्यांचे प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मोठा प्रतिसाद दर्शवित आहे .

सातपुड्याची शान अंबाबरवा अभयारण्याला निसर्गाची देण असून त्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सातपुडा पर्वतरांगेचे घनदाट जंगल, जैवविविधता आणि आता वाघांचे सातत्याने होणारे दर्शन यामुळे दूरदूर पर्यटक मोठ्या संख्येने जंगल सफारीसाठी वसाडी येथे येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close