Uncategorized

ठाणेदर संदीप काळे यांच्या संकल्पनेतून श्री महाकाल कावड ग्रुप टुनकीच्या वतीने भव्य महा रक्तदान शिबिर यशस्वी संपन्न…

अध्यात्मिक व सामाजिक बांधिलकीचा संदेश 50 रक्तदात्यांचे रक्तदान सोबतच वृक्षारोपणाचा संकल्प .

युवा महाराष्ट्र11 न्युज(प्रभुदास पारस्कार)    

       संग्रामपूर तालुक्यातील टुनकी येथील श्री महाकाल कावड यात्रा मंडळाच्या वतीने अध्यात्मिक व सामाजिक उपक्रमाची जोड महा रक्तदान शिबिर रक्तदात्यांच्या उस्फुर्त प्रतिसादाने रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाले .
08 ऑगस्ट शनिवार रोजी सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत श्री महाकाल कावळ यात्रा ग्रुपच्या वतीने राबविलेल्या महा रक्तदान शिबिर 50 रक्तदात्यांनी केले रक्तदान सदर शिबिराला गावातील व परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत रक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले .याचबरोबर पुढील आठवड्यात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा केला संकल्प धार्मिक उत्सवांना सामाजिक बांधिलकीची जोड देण्याच्या पोलीस स्टेशन सोनाळा चे ठाणेदार संदीप काळे यांच्या संकल्पनेला टुनकीवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याच अनुषंगाने टुनकी येथील श्री महाकाल कावड यात्रा मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल 50 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
ठाणेदार संदीप काळे यांनी सामाजिक व धार्मिक मिरवणुकांना परवानगी घेण्यापूर्वी पर्यावरण संवर्धनासाठी पाच झाडांचे वृक्षारोपण व संगोपन करणे, तसेच अध्यात्मिक कार्यक्रमांसोबत समाजाचेही काही देणे लागते या उदात्त हेतूने रक्तदान शिबिर, स्पर्धा परीक्षा , शालेय विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप, शैक्षणिक साहित्याचे वाटप यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन यावेळी केले आहे. विविध मंडळे व नागरिकांना ते सातत्याने या उपक्रमाबाबत मार्गदर्शन व प्रोत्साहन देत आहेत .
ठाणेदार संदीप काळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत टुनकी येथील श्री महाकाल कावड यात्रा मंडळाने वृक्षारोपण व रक्तदानाचा संकल्प हाती घेतला. त्यानुसार 08 ऑगस्ट शनिवार रोजी टुनकी बसस्थानक चौकात सईबाई मोटे शासकीय रुग्णालय शेगाव येथील रक्तपेढी पथकाचे डॉ आशुतोष पारस्कर ,श्रीमती जी के पानझडे , डॉ.समीर अलीमुद्दीन , डॉ.कौस्तुभ घोडके , डॉ.परमेश्वर कावले व डॉ.विजय मुऱ्हे यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात कावड मंडळाचे सदस्य, गाव परिसरातील युवक व ग्रामस्थ अशा एकूण 50 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत रक्तदान केले.
विशेष म्हणजे, रक्तदान शिबिराची सुरुवात ठाणेदार संदीप काळे यांनी स्वतः सर्व प्रथम व त्यांच्यासोबत पोलीस कर्मचारी संदीप पवार व परमेश्वर तितरे यांनीही रक्तदान करून सदर शिबिराला सुरुवात केली असून यामुळे पोलिसांची सामाजिक बांधिलकीचे उदाहरण निर्माण केले.
यावेळी ठाणेदार संदीप काळे यांनी “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान” आपल्या रक्तदानामुळे गरजू रुग्णाला जीवनदान मिळू शकते. धार्मिक व सामाजिक उत्सव केवळ उत्सव न राहता त्यांना समाजोपयोगी कार्याची जोड मिळाली पाहिजे ” असे आवाहन केले.
दरम्यान, श्री महाकाल कावड मंडळाच्या सदस्यांनी पुढील आठवड्यात टुनकी गावात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला आहे. धार्मिक , अध्यात्मिक श्रद्धेसोबत सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवत कावड मंडळाने घेतलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
या रक्तदान शिबिरास श्री महाकाल कावड मंडळाचे अध्यक्ष सागर लोनकर, योगेश फलके , लहुजी लोनकर , गोविंदा आखरे , अनिकेत लोनकर, संजय बावस्कार ,अवि मेहनकार , मोहन राऊत , सुपेश कहाते , गणेश जाधव , अनंता लोनकर, केशव घाटोळे , शांताराम धुळे , अजय मातोडे , सावन जमरा व सुरजसिंग भाटीया पदाधिकारी तथा पोलीस कर्मचारी, शेगाव रक्तपेढीचे कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close