Uncategorized

टुनकी बु येथील युवकाचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू ; गावावर शोककळा

युवा महाराष्ट्र11न्युज

प्रतिनिधी -✍️( प्रभुदास पारस्कार,)

संग्रामपूर तालुक्यातील टुनकी येथील रहिवासी, होतकरू युवक सुधीर मांडोकर (वय 32) याचा मंगळवार दि. 28 ऑक्टोबर रोजी रात्री 09 वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण दुचाकी अपघातात जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण टुनकी गावावर शोककळा पसरली आहे .मिळालेल्या माहितीनुसार, सुधीर मांडोकर व त्याचा मित्र वैभव उर्फ नाना शेगोकार हे दोघे अकोला येथून दुचाकीने टुनकीकडे येत असताना वल्लभनगर जवळ त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात सुधीरचा जागीच मृत्यू झाला, तर वैभव शेगोकार हा गंभीर जखमी असून त्याच्यावर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सर्वगुणसंपन्न अशा युवकाचा अंत…
सुधीर हा अत्यंत हुशार, कामात चपळ आणि मनमिळावू स्वभावाचा युवक होता. सामाजिक, अध्यात्मिक व प्रत्येक क्षेत्रात तो तत्परतेने सहभागी होत असे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर “काय म्हणता पोट्टे हो ” या या वाक्याने सोशल मीडियावर फेमस तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजुरांच्या कष्टाची व्यथा आपल्या अभ्यासपूर्ण शब्दात मांडून तो त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत होता.

सन 2023 मध्ये त्याने जि.प. मराठी शाळा टुनकी येथे शिक्षण सेवक म्हणून 4 ते 5 महिने उत्कृष्ट अध्यापनाचे कार्य केले होते. शालेय उपक्रमातही त्याचे मोलाचे योगदान होते. स्वतःच्या शेतात काबाडकष्ट करण्यासोबतच तो पेट्रोल पंपावर काम करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत होता. त्याच्या याच जिद्द, चिकाटी आणि मेहनतीमुळे त्याने सर्वांमध्ये एक आदर्श व्यक्ती म्हणून आपली ओळख निर्माण केली होती.

त्याच्या पार्थिवावर गुरूवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास टुनकी येथील वसाडी रोडवरील वैकुंठधाम स्मशानभूमी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील सर्व स्तरातील नागरिक, शेतकरी, युवक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्याच्या पश्चात दोन वर्षाचा चिमुकला शिवम , पत्नी ,आई-वडील, दोन भाऊ, एक बहीण तसेच काका मोठे बाबा व त्यांची मुलं कुटुंबीय असा आप्त परिवार आहे. सुधीरच्या जाण्याने एका धडपड्या व समाजाभिमुख युवकाला टुनकी गाव मुकले आहे. सुधीरच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close