Uncategorized

श्री रतन कुंजीलाल निंबोकार यांना “एकलव्य एकल आदर्श शिक्षक पुरस्कार” ने सन्मानित करण्यात आले….

युवा महाराष्ट्र11 न्युज
(प्रभुदास पारस्कार)
     जळगाव (जा) तालुक्यातील उमापुर केंद्र शाळेचे शिक्षक श्री. रतन कुंजीलाल निंबोकार यांनी शालेय विद्यार्थ्यांना विविध उपक्रमाद्वारे शिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल “एकलव्य एकल आदर्श शिक्षक पुरस्कार” ने सन्मानित करण्यात आला .
एकलव्य एकल विद्यालय आदर्श शिक्षक पुरस्कार कै लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था नागपूर विदर्भ यांच्याद्वारे पूर्व व पश्चिम विदर्भातील 12 जिल्ह्यांमध्ये एकूण 1328 शाळा कार्यरत आहे .    एकलव्य एकल विद्यालय ही एक शिक्षकी शाळा असते त्यामध्ये विद्यार्थ्यांना खेळ , व्यायाम , गणिताच्या सोप्या पद्धती , शुद्धलेखन वाचन , राष्ट्रभक्ती , देशभक्ती गीते , तसेच विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण दिले जाते . विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक जबाबदारी सांभाळत गावातील सामाजिक क्षेत्रातही कार्यरत सहभाग घेऊन शासकीय योजनांची माहिती देऊन गावाच्या विकास कार्यामध्येही सहकार्य करतात .
याच एकलव्य एकल विद्यालयातील विभाग जळगाव जामोद मधून केंद्र उमापूर शाळेचे शिक्षक श्री रतन कुंजीलाल निंबोकार यांनी विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून शिक्षण तसेच सामाजिक सहकार्य केले तसेच शाळे व्यतिरिक्त गावातील महिलांना कृषी विभाग मार्फत पशुधन योजनांचा लाभ मिळून देत रोजगार उपलब्ध करून दिला .एनजीओच्या माध्यमातून आदिवासी गरजू विद्यार्थ्यांना बाहेरगावी शिक्षणाकरिता सायकली चा लाभ तसेच अनाथ मुला मुलींना महिला बालकल्याण विभाग मार्फत 31 लाभार्थ्याचा 2500 रुपये महिना पगारचा लाभ ,पंचायत समिती मार्फत सात आदिवासी मुलींना मोफत कॉम्प्युटर कोर्स चा लाभ असे बरेचसे शासकीय योजनेचा लाभ गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचे कार्य केले . अशाच कार्याची दखल म्हणून एकलव्य एकल विद्यालयाच्या सन 2025-26 मध्ये उत्कृष्ट शिक्षक म्हणून श्री रतन कुंजीलाल निंबोकार यांची निवड करण्यात आली असून निरीक्षक आणि उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे संस्थेचे सचिव प्रशांत जी बोपर्डीकर ,पूर्णकालीन श्री भारत जी भुजाडे,जिल्हा पर्यवेक्षक अजबराव भास्कर ,विभाग पर्यवेक्षक नियाल सुलिया ,केंद्र पर्यवेक्षक बहारसिंग बारेला यांनी निवड केली .
20 ऑगस्ट चे 23 ऑगस्ट रोजी सती अनुसया माता देवस्थान पारडसिंगा ,तालुका काटोल जिल्हा नागपूर येथे झालेल्या प्रशिक्षण वर्ग आयोजित सोहळ्यात मा.नितीन जी गडकरी केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक व महामार्ग ,  जय गंगा कोचिंग (OPC) प्रा.ली. ओडीसा संस्थापक मा.श्री किरणजी ,आदिवासी मंत्री अशोक उईके संस्थेचे अध्यक्ष श्री अतुलजी खिरोडकार यांच्या हस्ते श्री रतन कुंजीलाल निंबोकार यांचा शाल श्रीफळ तसेच धनादेश देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी सत्कार समारंभाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच संस्थेचे पदाधिकारी एकलव्य एकल विद्यालयाचे सर्व 1328 शिक्षक तसेच 167 पर्यवेक्षक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close