Uncategorized

टुनकी बु येथे जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये पालक मेळावा संपन्न….

👉 पालक मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितार्थ लोकवर्गणीतून नाविन्यपूर्ण उपक्रमाला सुरुवात करण्यात आली .

युवा महाराष्ट्र11 न्युज
(प्रभुदास पारस्कार )

संग्रामपूर तालुक्यातील टुनकी बु येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा येथे 02 एप्रिल रोजी सकाळी 08 वाजता पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता . आयोजित पालक मेळाव्यात विद्यार्थी माता व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थीच्या शैक्षणिक व भौतिक या सर्व बाबींचा आढावा घेतला .आयोजित मेळाव्या दरम्यान सर्वप्रथम उच्च श्रेणी मुख्याध्यापक इंगळे सर ,माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र वानखडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली . यावेळी शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक संजय इंगळे, शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा सदस्य असंख्य विद्यार्थी माता पालक गावातील गणमान्य मोठ्या संख्येने उपस्थित होते . विद्यार्थ्यांच्या कला गुण कौशल्य व शाळा चांगली प्रगतीबाबतीत पालकांनी आपले विचार मांडले . मुख्याध्यापक इंगळे सर यांनी शाळेबद्दल व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबाबत आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर माजी सरपंच तथा ग्रा पं सदस्य राजेंद्र वानखडे यांनी ग्रामपंचायत स्थरावर शाळेच्या विकासासाठी कटीबध्द असुन शाळा चांगली व सुंदर बाह्य सौंदर्यीकरण करण्यात आले तसेच भौतिक सुविधांसह चांगली सुंदर शाळा बनवण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवणार त्यांनंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पालकांची कर्तव्य, भूमिका व जबाबदारी काय असायला पाहिजे याबाबत बोलतांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बुद्धिमत्ता वाढीसाठी आवश्यक बाबींसाठी लोकवर्गणीतून प्रत्येकाचं योगदान दिले पाहिजे या स्तुत्य संकल्पना सादर केली आणि यांच संकल्पनेची सुरुवात पालक मेळाव्यात विद्यार्थी पालक आनंदा कासोकार यांनी 1101 रु देऊन सुरुवात केली . त्यानंतर माजी सरपंच व ग्रा पं सदस्य राजेंद्र वानखडे यांनीही 1101 रु देऊन लोकवर्गणी सहभागी झाले . त्यानंतर शाळा मुख्याध्यापक व शिक्षक सर्व वृंद यांनाही सहभाग घेत सर्व शिक्षकांनी प्रत्येकी 1000 रु दिले तथा , श्री गजानन निंबोळकार 500 रु , श्रीधर चोरे 500 रु , अजय काटकर 500 रु , आकाश तायडे 200 रु , राहूल जयस्वाल 200 रु, चंद्रभूषण इंगळे 200 रु , राजु आप्तुरकार 200 रु , भागवत बावस्कार 200 रु , करणसिंग भाटीया 100 रु, शिवाजी महाले 100 रु , गोपाल झामरे 100 रु , अनंता उंडे 100 रु , सोपान गायकी 100 रु ,
इतर उपस्थित अनेक पालंकानीही अशा प्रकारे आपल्या इच्छेप्रमाणे यावेळी शाळेतील विद्यार्थी हितार्थ लोकवर्गणी देऊन सहकार्य करण्यात आले.
शाळेच्या वतीने सर्वांचे आभार मानले तसेच रविंद्र चाटे सर यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या शैक्षणिकदृष्ट्या शाळेतील शिकवणी करतोच पण पालकांनी आपल्या मुलांना शाळेतील उपस्थिती व दैनंदीन अभ्यास यासाठी लक्ष घालणे आवश्यक असते तसेच संजय दामधर सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांवर सकारात्मक विचार आणि शिक्षणाप्रती आवड निर्माण कशी होईल या गोष्टीवर भर देणे महत्त्वाचे आहे असे व्यक्त केले .
शाळेचा भौतिक दर्जा सुधारणे हे ग्रामपंचायतीने तर शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे हे जबाबदारी शिक्षकांनी स्वीकारली. परंतु पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष देऊन त्याचे कडून अभ्यास करून घेणे, त्याची स्वच्छता राखणे, त्याचे आरोग्य सांभाळणे हे जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे असे प्रतिपादन यावेळेस करण्यात आले. तर मुख्याध्यापक इंगळे सर यांनी
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत प्रत्येक वर्गशिक्षक यांनी वर्गातील शिकवणी व विद्यार्थ्यांबाबत पालकांसमोर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय दामधर, सूत्रसंचालन निलेश पवार सर आभारप्रदर्शन सुरत्ने सर यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा मुख्याध्यापक संजय इंगळे , विश्वजीत वक्टे सर, सचिन कात्रे सर, रवींद्र चाटे सर, संजय दामधर सर , इप्रान सुरत्ने सर, निलेश पवार सर , श्रुती लाहोटी मॅडम, प्राजक्ता सातव मॅडम ,मनीषा इंगळे मॅडम तथा समस्त शिक्षक वृंद व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला शेवटी सामूहिक हितगुज आणि चर्चा यशस्वीपणे पूर्ण करत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला .

  [ चौथीच्या वर्गातील कु.पुनम पारस्कार ,कु आरुषी पिंपळकर व कृष्णाली खूपसे
या मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत येऊन आरतीचे ताट घेऊन पालक मेळाव्यात उपस्थित सर्व विद्यार्थी माता , पालकांचे तथा मान्यवरांचे कुंकूवाचे तिलक लावून स्वागत केले . यामुळे त्यांचे उपस्थित सर्व माता-पालक व मान्यवरांच्या वतीने मोठ्या आनंदाने कौतुक करण्यात आले . ]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close