सोगोडा जिल्हा परिषद मराठी शाळेचा आगळावेगळा उपक्रम विविध भाषेत वेशभूषेसह सादर होतो परिपाठ.

युवा महाराष्ट्र11 न्युज प्रभुदास पारस्कार :-
संग्रामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, सोगोडा येथील इयत्ता दुसरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी चक्क हरियाणवी भाषेत परिपाठ सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच परिपाठामध्ये भारतातील प्रमुख भाषांसह वेशभूषेतील गुण कौशल्य सादरीकरणाचे जिल्हा शिक्षणाधकारी यांनी विषेश कौतुक केले . आपल्या भारत देशात भाषिक विविधता आढळते आपला देश भाषांचा महासागर म्हणूनओळखला जातो तसेच आपल देश एकता आणि सौंदर्याने नटलेला देश आहे . आपण म्हणतो ना – “कोस-कोस पर पानी बदले, चार कोस पर वाणी बदले” प्रत्येक काही अंतरावर भाषा बदलते. आपल्या देशात 22 अधिकृत भाषा असून संविधानाच्या 8 व्या परिशिष्टात मान्य केल्या आहेत . जसे मराठी, हिंदी, बंगाली, तमिळ, तेलुगु, मल्याळम, गुजराती, पंजाबी, उर्दू, संस्कृत आणि इतर. पण प्रत्यक्षात भारतात 1600 हून अधिक बोलीभाषा बोलल्या जातात. हिंदी ही सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे, पण प्रत्येक राज्याची स्वतःची शान आहे . त्यात महाराष्ट्राची मराठी, तामिळनाडूची तमिळ, बंगालची बंगाली, केरळची मल्याळम. या सर्व भाषांचा जन्म संस्कृत, द्रविड आणि इतर प्राचीन भाषाकुळातून झाला आहे. भाषा म्हणजे फक्त बोलण्याचे साधन नाही, ती संस्कृती आहे. संत ज्ञानेश्वरांनी मराठीतून ज्ञानेश्वरी लिहिली, तर तिरुवल्लुवर यांनी तमिळमध्ये तिरुक्कुरल लिहिले. प्रत्येक भाषेत असेच महान साहित्य आहे. या विविधतेतच आपली एकता आहे. आपण वेगवेगळ्या भाषा बोलतो, पण आपल्या भावना एकच आहेत . यातीलच वास्तविक पाहता येईल जिल्हा परिषद मराठी शाळा सोगोडा येथील शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध भाषेतील कौशल्य गुण व शिक्षक विद्यार्थ्यांना विविध भाषांचे ज्ञान व्हावे म्हणून विषेश शैक्षणिक गुणवत्तेवर भर देत परिपाठामध्ये विद्यार्थ्यांना विविध वेशभूषासह भाषांत अनुवाद अत्यंत आत्मविश्वासाने परिपाठ सादरीकरण केले जाते . यामध्ये सुविचार,पंचांग,बोधकथा,म्हणी ,प्रेरक विचार,उपक्रम,सामान्य ज्ञानाचे प्रश्न यासह 12 मुद्द्यांचा समावेश परिपाठा मध्ये करून हे विविध मुद्दे हरियाणवी भाषेत सादर केले. या परिपाठाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी हरियाणा प्रदेशातील पारंपरिक वेशभूषा परिधान करून आपल्या सादरीकरणाला आगळावेगळा रंग दिला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ एका वेगळ्या भाषेची ओळख करून घेतली नाही, तर त्या भाषेची संस्कृती, बोलीभाषा आणि वेशभूषेचीही माहिती करून घेतली. अवघ्या दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी कोणताही संकोच न बाळगता हरियाणवी भाषेत केलेले सादरीकरण विशेष कौतुकास्पद ठरले. आतापर्यंत इतर 15 भाषांमध्ये परिपाठ सोगोडा जि प मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तम सादरीकरण केले . सर्वांगीण विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले असून यशस्वी राबविली जात आहेत. आतापर्यंत विद्यार्थ्यांनी मालवणी, अहिराणी, वऱ्हाडी यांसह महाराष्ट्रातील विविध बोलीभाषा तसेच पंजाबी, गुजराती, बंगाली, कन्नड, राजस्थानी, भोजपुरी आदी भारतातील विविध भाषांमध्ये संबंधित राज्यांच्या पारंपरिक वेशभूषेत परिपाठ सादर केला आहे. विविध भाषांमध्ये परिपाठ सादर करण्याचा उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक दाते सर,ढगे सर,राठोड सर,पांडे सर, सोनोने मॅडम,चव्हाण मॅडम,चांदूरकर मॅडम यांनी यशस्वीरित्या राबविला असून, या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
वर्गशिक्षिका सौ. राठोड मॅडन यांनी बोलतांन सांगितले की भाषा आणि संस्कृतीची विद्यार्थ्यांना ओळख“वेगवेगळ्या राज्यांतील भाषा, बोली, संस्कृती आणि वेशभूषा यांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, तसेच त्यांच्यामध्ये विविधतेचा आदर निर्माण व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवित आहोत,” या उपक्रमाला पालकांचेही मोठे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. विद्यार्थ्यांच्या वेशभूषेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मा.श्री. सारंग कुलकर्णी गटशिक्षणाधिकारी संग्रामपूर सोगोडा शाळेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे .ही एक गर्वाची बाब आहे .सोगोडा शाळा ही उपक्रमशील शाळा असून “अशा प्रकारचे वेगवेगळे आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे म्हणजे जिल्हा परिषद शाळांना नवसंजीवनी देण्यासारखे आहे,” असे त्यांनी सांगितले. या शाळेतील आगळ्या वेगळ्या उपक्रमाची माहिती मा. शिक्षणाधिकारी साहेबांना देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. भाषेच्या माध्यमातून भारताची विविधता आणि संस्कृती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या सोगोडा शाळेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे .



