जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप करत केला वाढदिवस साजरा.

संग्रामपूर तालुका प्रतिनीधी
प्रभुदास पारस्कार :-
👉 “ओल्ड फ्रेंड ग्रुप” ची संकल्पना विविध सामाजिक उपक्रम राबवित मित्र वाढदिवस साजरा करण्याचा निर्धार … संग्रामपूर तालुक्यातील लाडणापुर येथील जिल्हा परिषद शाळेतील माजी विद्यार्थी श्री संगम सोनोने यांनी वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा लाडणापुर विद्यार्थ्यांना “ओल्ड फ्रेंड ग्रुप” च्या माध्यमातून शैक्षणिक राहित्य वाटत करून विद्यार्थ्यांसोबत मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा केला . यावेळी गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते त्यांनी या कौतुकास्पद उपकरणाचे स्तुतीसुमने उधळली “ओल्ड फ्रेंड ग्रुप” चे पुर्ण शाळेची रंगरंगोटी करण्याच्या निर्णयाबद्दल कौतुकासह आभार व्यक्त केले . श्री.संगम सोनोने यांचा वाढदिवस जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत ग्रुपचे सर्व मित्र मंडळीच्या उपस्थितीत मोठ्या आनंदाने वाढदिवस साजरा करण्यात आला .यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा लाडनापुर शाळेची ओल्ड फ्रेंड ग्रुप च्या माध्यमातून शाळेची पूर्ण रंगरंगोटी करण्याचा निर्णय घेतला . जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व शाळेची पूर्ण रंगरंगोटी करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाचे शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय शिवाजी आढे सर तथा शिक्षक वृंद,शाळा व्यवस्थापन समिती व गावकरी यांनी सर्व ओल्ड फ्रेंड ग्रुपच्या मित्रमंडळींचे आभार मानले .तदनंतर सोनाळा पोलीस स्टेशन येथे नेमकेच रुजू झालेले मा .संदीप काळे ठाणेदार पोस्टे सोनाळा यांची सदिच्छा भेट घेऊन “ओल्ड फ्रेंड ग्रुप” वतीने सत्कार करण्यात आला . मा. संदीप काळे ठाणेदार यांनीही संगम सोनोने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सर्व मित्रमंडळी ओल्ड फ्रेंड ग्रुपच्या माध्यमातून करत असलेल्या उपक्रमाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . ओल्ड फ्रेंड ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असलेल्या उपक्रमात सहभागी होत आमच्या वतीने जे काही सहकार्य लाभले ते करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सदिच्छा भेटी दरम्यान ठाणेदार मा.संदीप काळे बोलत होते . यावेळी नाजिमोद्दीन सौदागर , श्री दिनेश दुधमल, श्री संगम सोनोने, श्री दत्ता चोरे, श्री सुरजीतसिंग बाबर, श्री संजय वानखडे, श्री अनिल खेडकर, श्री संतोष चिकटे, श्री गोपाल दिवकर, श्री विजय झाल्टे, श्रीकृष्ण बोरकर, श्री विनोद निबोळकार, श्रीकृष्ण निबोंळकार, श्री प्रविण रायपुरे, श्री साहेबराव तायडे

सिंकदर , श्री गोपाल दातीर, श्री दिपक मानकर ओल्ड फ्रेंड ग्रुप चे सर्व मित्र यावेळी उपस्थित होते .



