Uncategorized

अंबाबरवा अभयारण्यात पर्यटकांना पाच पट्टेदार वाघांचे एकाच वेळी दर्शन; पर्यटकांचा आनंद द्विगुणित

नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या अंबाबरवा अभयारण्याची श्रीमंती वाढली ;

युवा महाराष्ट्र11 न्यूज प्रतिनीधी (प्रभुदास पारस्कार),

संग्रामपूर तालुक्यातील अंबाबरवा अभयारण्यात पर्यटकांना जंगल सफारी दरम्यान एकाच वेळी तब्बल पाच पट्टेदार वाघांचे दर्शन ;जंगल सफारी साठी येणाऱ्या पर्यटकांना वन्यप्राणी दर्शन देऊन आकर्षित करीत आहेत . नैसर्गिक सौंदर्याने नटलेला व वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ अंबाबरवा अभयारण्याची श्रीमंती वाढली ,

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट असलेल्या आणि सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीत वसलेल्या अंबाबरवा अभयारण्यात वन्यजीवांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, जंगल सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांना वन्यप्राणी हमखास दर्शन देत आहेत. अशीच एक पर्यटकांसाठी आनंद द्विगुणित करणारी घटना शनिवारी दुपारी घडली, जेव्हा एकाच वेळी तब्बल पाच पट्टेदार वाघ पर्यटकांना निदर्शनास पडले.

शनिवारी दुपारी 03 वाजताच्या सुमारास सुरू झालेल्या जंगल सफारीदरम्यान छत्रपती संभाजीनगर, पुणे, चिखली, जळगाव जामोद येथून आलेल्या पर्यटकांच्या नशिबी ही पर्वणी लाभली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट सोनाळा वन्यजीव परिक्षेत्राअंतर्गत सातपुडा पर्वत रांगेतील अंबाबरवा अभयारण्यात एकाच वेळी पाच पट्टेदार वाघांचे दर्शन होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मानले जात आहे. जंगल सफारी दरम्यान पर्यटकांना वाघोबाशिवाय इतर प्राणीही दिसत आहेत .

पाटापाणी भागात पाणवठ्यावर ठिय्या..
वसाली येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज जंगल सफारी गेटपासून अंबाबरवा कडे जाणाऱ्या सफारी रस्त्यावरील पाटापाणी भागात पाणवठ्यावर एक वाघ बसलेला दिसून आला. काही वेळातच त्याच परिसरात थोड्याच अंतरावर पाच पट्टेदार वाघ निदर्शनास पडले. एकाच ठिकाणी पाच वाघ पाहून पर्यटकांनी आनंदाने जल्लोष केला आणि या दुर्मिळ क्षणाचे छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. वाघांसोबतच इतर वन्यप्राण्यांचेही दर्शन झाल्याने पर्यटकांचा आनंद द्विगुणित झाला.

यावेळी दुपारच्या वेगवेगळ्या जिप्सी सफारीमध्ये मार्गदर्शक म्हणून खुमसिंग डावर, भीमा सावळे, अजय सुरत्ने, अशोक पालकर, सागर पालकर, राजू डावर आदी उपस्थित होते.

वनपरिक्षेत्र अधिकारी मा.श्री अजय बावणे (वन्यजीव), सोनाळा, _ वसाली येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज जंगल सफारी मुख्य मार्गाने अंबाबरवाकडे जाणाऱ्या सफारी मार्गात 07 ऑक्टोंबर शनिवारी दुपारी 3 वाजता दरम्यान पाटापाणी भागात पर्यटकांना एका पाणवठ्यात निवांत बसलेला वाघ दिसला. त्याच ठिकाणी काही अंतरावर 5 वाघ निदर्शनास पडले. यावेळी पाणवठ्यात बसलेल्या वाघाचे छायाचित्र पर्यटकांनी टिपले आहे. या पर्यटकांना वाघासह इतर वन्यप्राण्यांचे दर्शन झाल्याने पर्यटकांचा आनंद द्विगुणित झाला. “अंबाबरवा अभयारण्यात जंगल सफारीदरम्यान पर्यटकांना पट्टेदार 5 वाघ दिसून आले आहेत. एकाचवेळी 5 वाघांचे दर्शन पहिल्यांदा घडले आहे. अंबाबरवा अभयारण्यात वाघोबाशिवाय इतर वन्यप्राणी देखील पर्यटकांना दिसत आहेत.”_

नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या सातपुड्याची शान – अंबाबरवा
15 हजार 839.75 हेक्टर क्षेत्रफळात पसरलेले अंबाबरवा अभयारण्य हे सातपुडा पर्वताला लाभलेली निसर्गाची देण असून त्याला ऐतिहासिक वारसाही लाभला आहे. येथील वाढती वाघांची संख्या आणि पर्यटकांना होत असलेले सहज दर्शन यामुळे देशभरातून पर्यटक येथे जंगल सफारीसाठी मोठ्या संख्येने येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close