शैक्षणिक

श्रुती नाईक प्रथम, सक्षम दामधर द्वितीय तर तन्वी डाबेराव तृतीय; विद्यार्थ्यांच्या यशाने सोनाळा परिसरात आनंदोत्स

“श्री सोनाजी महाराज हायस्कूलचा शिष्यवृत्ती परीक्षेत यश !”

सतीश वानखडे (सोनाला प्रतिनिधी)

 संग्रामपूर : शिक्षण क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या श्री सोनाजी महाराज हायस्कूल, सोनाळा येथील विद्यार्थ्यांनी यंदाच्या पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत दमदार यश संपादन करून शाळेच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवला आहे. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यंदा पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी श्री सोनाजी महाराज हायस्कूलमधून एकूण ९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी तब्बल ३ विद्यार्थी पात्र ठरून शाळेची शैक्षणिक गुणवत्ता अधोरेखित केली आहे. या परीक्षेमध्ये कु. श्रुती प्रकाश नाईक हिने 69.33 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. तर सक्षम सुमेध दामधर याने 66.66 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवत घवघवीत यश संपादन केले. तसेच कु. तन्वी सोनाजी डाबेराव हिने 63.33 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवून शाळेच्या यशात मोलाची भर घातली. लहान वयातच जिद्द, चिकाटी, अथक परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यास यांच्या जोरावर विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशामागे शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन, पालकांचे प्रोत्साहन आणि विद्यार्थ्यांची प्रामाणिक मेहनत कारणीभूत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. श्री सोनाजी महाराज हायस्कूलने ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम बनविण्याचे कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत असून भविष्यात आणखी मोठे यश संपादन करण्यासाठी उत्साह निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल शाळा प्रशासन, शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहे

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close