Uncategorized

टुनकी येथे “सोहळा समानाचा” देशसेवेसाठी नियुक्त युवक-युवतींच्या सन्मानार्थ कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी संपन्न..

माय बेस्ट फ्रेंड व ओल्ड फ्रेंड ग्रुपच्या वतीने आयोजीत "सोहळा सन्मानाचा"

(प्रभुदास पारस्कार) :-
संग्रामपूर तालुक्यातील टुनकी बु येथे प्रजासत्ताक दिनी 05:30 वाजता जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेसमोर 26 जानेवारी रोजी भव्य दिव्य असा “सोहळा सन्मानाचा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . माय बेस्ट फ्रेंड्स व ओल्ड फ्रेंड ग्रुपच्या वतीने देश सेवेसाठी नियुक्त झालेल्या युवकांचा शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत युवक युवतींचा सन्मानचिन्ह व मोठ्या फटाक्याच्या आतिषबाजीत सन्मान करण्यासाठी “सोहळा सन्मानाचा” कार्यक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना तसेच पालकांनाही प्रेरणा मिळावी म्हणून भव्य दिव्य सुशोभित मंच “सोहळा सन्मानाचा” आयोजन करण्यात आला होते . टुनकी , बावनबीर व लाडणापुर येथील मुला मुलींची देशासाठी सुरक्षा दलामध्ये निवड करण्यात आली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि सत्कार करण्याचा विचार आणि शालेय विद्यार्थ्यां स्पर्धा परीक्षा तसेच भरती सराव करणाऱ्या मुला मुलींसाठी प्रेरणादायी सत्कार सोहळा करण्याचा निर्णय “माय बेस्ट फ्रेंड व ओल्ड फ्रेंड ग्रुपच्या” वतीने करण्यात आला . यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख व टुनकी गावचे प्रथम नागरिक सरपंच सौ. सिमाताई राजेंद्र वानखडे ,प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाडनापुर ग्रामपंचायत सरपंच सौ अनिताताई गणेश बावस्कर , वसाडी ग्रामपंचायत सरपंच समजकौर हरपालसिंग बाबर , प्राध्यापक ज्ञानेश्वर भुते तथा सत्कारमूर्ती इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे मार्गदर्शक सोनाळा पोलीस स्टेशन ठाणेदार संदीप काळे यांच्या हस्ते “सोहळा सन्मानाचा” कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज , महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून सामुहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली . ठाणेदार संदीप काळे यांनी मार्गदर्शन करताना शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाबद्दल महत्त्वाचे धडे देत स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग नोंदवावा त्याचा फायदा होईल आणि घेतलेल्या मेहनतीला यश प्राप्त होईलच तसेच अध्यात्मिक , आरोग्य आणि स्वस्थता कायदेविषयक मार्गदर्शनपर उपस्थित मुला-मुलींना व पालकांना आपल्या भाषणातून व्यक्त केले . भारतीय नौदलामध्ये कार्यरत पवन वाडकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुला-मुलींना केलेल्या कार्याबद्दल यावेळी बोलताना केले .
देश सेवेसाठी नियुक्त झालेल्या युवक युवतींचा या सत्कारमूर्तीं (ClSF) विशाल वामन बेलोकार,(ClSF) सौ वर्षा आकाश लोनकर ,(BSF) गौरव रवींद्र मानकर, (BSF) पवन देवसिंग डाबेराव , (Mumbai police) शुभम गजाननराव झाल्टे, (CRPF) मंगेश दिगांबर सुलताने , (GMC) आरती राजू राठोड , (GMC) समीर सौदागर , (MSF) परमेश्वर समाधान गिऱ्हे , (MSF) सागर सखाराम वानखडे , (MSF) नितेश बाजीराव घाटे , (AR) अक्षय ईश्वरसिंग डाबेराव व भारतीय नौदलात कार्यरत पवन संतोष वाडकर यांचा आई-वडिलांसह शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन बेस्ट फ्रेंड व ओल्ड फ्रेंड ग्रुपचे सदस्यांनी सहपत्नीक यांच्या हस्ते क्रमशः यथोचित सन्मान करण्यात आला . या कार्यक्रमाला प्रत्येक शाळेतील एकाएक गटातील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण केले आणि उपस्थिती सर्वांचे मन जिंकले
जिल्हा परिषद मराठी शाळा लाडणापुर विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालात राष्ट्रगीताने सादरीकरण ,आदिवासी विद्यालय टुनकी यांनी स्काऊट-गाईड विद्यार्थी विद्यार्थिनींनी एटीत कवायत सादर , जिल्हा परिषद मराठी शाळा टुनकी चिमुकल्यांचे देशभक्ती गीत व जि प उर्दू शाळा टुनकी बु यांनी देश भक्ती गीत सादर केले तर कार्यक्रमाच्या शेवटी बेस्ट फ्रेंड ग्रुपच्या सदस्यांनी आपापल्या जाती धर्माचे वेषांतर करून “मेरे देश प्रेमीयो” या देशभक्ती गीतावर सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थनेसह सादरीकरण करत एकतेचा संदेश देत 30 वर्षापासुन जुन्या जिवलग मैत्रीचेही वर्णन केले . या दरम्यान सर्व शाळा शिक्षकांनी सहकारी मित्र व गावकरी यांनी  मोलाचे सहकार्य लाभले . बावनबीर , लाडणापुर , वसाडी येथील विद्यार्थी पालक शिक्षक तसेच गावातील असंख्य नागरीक सहभागी होत “सोहळा सन्मानाचा” या कार्यक्रमाला यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी सहकार्य लाभले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माय बेस्ट फ्रेंड व ऑल फ्रेंड ग्रुप यांचे अथक परिश्रम जि प मराठी व उर्दू शाळा टुनकी बु , जि प मराठी शाळा लाडणापुर व आदिवासी विद्यालय टुनकी बु या सर्व शाळा शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले यामुळे नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल खेडकर सर तर आभार प्रदर्शन संजय वानखडे यांनी केले .

 

@##

टुनकी भावचे प्रथम नागरीक सरपंच सौ सिमाताई वानखडे , वसाडी तथा लाडणापुर सरपंच तथा सत्कारमूर्ती युवकांचे पालक
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 32768;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 33;

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close