Uncategorized

बुलढाणा जिल्हा रोजगार संघटना सहाय्यक सहसचिवपदी श्री अर्जुन ढगे यांची नियुक्ती

संग्रामपूर तालुका रोजगार सहायक संघटनेच्या वतीने श्री अर्जुन ढगे यांची सहसचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार

(प्रभुदास पाटस्कार) संग्रामपुर :-
छत्रपती शिवाजी महाराज सभागृह
पंचायत समिती संग्रामपूर येथे बुलढाणा जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते ,  बुलढाणा जिल्हा रोजगार सहाय्यक सहसचिव पदी श्री अर्जुनभाऊ ढगे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा संग्रामपूर तालुका रोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तसेच बुलढाणा जिल्हा रोजगार सहायक संघटना अध्यक्षपदी श्रीमंत देशमुख, सचिव पृथ्वीराज गवई, माजी जिल्हाध्यक्ष तथा मार्गदर्शक मदनजी खरात, संघटक संजय मोरे, सहसचिव सुनील पहुरकर, विधी सल्लागार ज्योतीराम इंगळे, भगवान अवसरमोल योगेश चिंचोले, शांतीलाल डोंगरे, गजानन लोखंडे, यांचा संग्रामपुर तालुका रोजगार सहायक संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देविदासजी शिंदे व प्रमुख उपस्थिती ,सत्कारमूर्ती तसेच जिल्हाध्यक्ष श्रीमंत देशमुख , जिल्हा सचिव पृथ्वीराज गवई ,राज्य सहसचिव तथा जिल्हा प्रसिद्धी मार्गदर्शक प्रमुख मार्गदर्शक मदन जी खरात व जिल्हा कार्यकारणीतील सर्व सदस्य सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
त्यावेळी संग्रामपूर तालुकाध्यक्ष राहुलभाऊ मेटांगे,तालुका उपाध्यक्ष सुरजभाऊ परघरमोर , सचिव गजानन भाऊ बामणे, शेषराव वानखडे, देविदास मेहंगे ,किशोर म्हसाळ , अक्षय गायगोळ , गौतमजी इंगळे, संतोषजी वानखडे , शेषरावजी वानखडे , रोशन भोजने , शाखेर सुरत्ने , विनोद मोरे , रवी मावसकर , सत्यभामा ताई चोपडे ,विलास गवांदे , सुरेश कुरवाडे, पांडुरंग खारोडे, ज्ञानेश्वर देविदास आगरकर , रामकृष्ण गावंडे ,गणेश मोरखडे, बाळकृष्ण बोदडे, नारायण वानखडे व भागवत भिसे इतर सर्व संग्रामपूर तालुक्यातील सर्व रोजगार सहाय्यक उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन ढगे यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल भाऊ मेटांगे यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संतोष वानखडे यांनी केले. त्यावेळी संग्रामपूर तालुक्यातील सर्व रोजगार सहायक उपस्थित होते . सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला .♦

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close