जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, सोगोडा येथे विविध भाषा संवादातून परिपाठ…
👉शालेय परिपाठामध्ये विविध भाषांमध्ये संवाद परिपाठ सादरीकरण विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव...

( प्रभुदास पारस्कार )
संग्रामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोगोडा येथे इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनींनी हरियाणवी भाषेत वैशिष्ट्यपूर्ण परिपाठ सादर केला. या उपक्रमात सहभागी विद्यार्थिनींनी हरियाणा प्रदेशातील पारंपरिक वेशभूषा परिधान करून सादरीकरण केले.
विशेष म्हणजे, विद्यार्थिनींनी कोणतेही लिखित स्वरूप न पाहता, मुखपाठ उजळणी आणि अस्खलित हरियाणवी भाषेत संवादातून परिपाठ आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण केले .
परिपाठ कार्यक्रमाला शाळा मुख्याध्यापक दाते सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश अरबे तसेच सर्व शिक्षकेत्तर विद्यार्थिनींचे कौतुक करून त्यांच्या या यशस्वी प्रयत्नांचे अभिनंदन केले.
याआधी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील वऱ्हाडी,अहिराणी,
मालवणी त्याचप्रमाणे भारतातील गुजराती, बंगाली,पंजाबी,राजस्थानी अशा विविध भाषांमध्ये परिपाठ मध्ये सादरीकरण केले आहे, महत्त्वाचे म्हणजे पंजाबी भाषेतील पाढे , वर्ग पहिलीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी व अहिराणी भाषेत परीपाठ सादर केला .
या उपक्रमामुळे सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विविध भाषांची ओळख निर्माण होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते,त्याप्रमाणे इतर विद्यार्थ्यांना विविध राज्यातील वेशभूषा, बोलीभाषेची ओळख व माहिती व्हावी हाच या उपक्रमाचा उद्देश आहे .
कौतुकास्पद उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सर्वांगीण प्रगतीसाठी चालना मिळेल त्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग सर्वपरी प्रयत्न करत आहेत .सर्वत्र विद्यार्थी व शिक्षकांचे मोठे कौतुक होत आहे .




