पळशी (झाशी) येथील महिला सरपंचा सौ प्रियंका मेटांगे सकाळ गौरवगाथाच्या मानकरी…
नागपूर येथे आयोजित सरपंच कॉफी टेबल बुक प्रकाशन सोहळ्यात सुप्रसिद्ध अभिनेते मा.सचिन खेडेकर यांच्या हस्ते सरपंच सौ प्रियंक मेटांगे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित..

युवा महाराष्ट्र11 न्युज
( प्रभुदास पारस्कार )
संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील महिला सरपंच प्रियंका मिटांगे यांचा नागपुर येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे आयोजित “सरपंच कॉफी टेबल बुक प्रकाशन सोहळा” प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले . संग्रामपूर तालुक्यातील विविध पुरस्कार प्राप्त आदर्श महिला सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे यांना सुप्रसिद्ध अभिनेते मा. श्री.सचिन खेडेकर व नागपूर जिल्हा परिषद सीईओ मा. श्री. विनायक महामुनी यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळ गौरवगाथा या पुस्तकाचे विमोचन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
पळशी (झाशी ) सरपंच पदाच्या कार्यकाळात सरपंच सौ प्रियांका राहुल मेटांगे यांनी गावातील प्रत्येक घटकाला दिलेल्या न्याय त्यांचा सन्मान करण्यात आला. यापूर्वी सुद्धा त्यांना त्यांच्या कार्याची दखल घेत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांनी आपल्या कार्यकाळात सर्व सामान्य नागरिकांच्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून जसे, विज, पाणी पुरवठा यांचे योग्य नियोजन, गावातील अपंग व्यक्ती,शाळा, अंगणवाडी, कर्मचाऱ्यांबद्दल असलेली आपुलकी व त्यांचे केलेले नियमित पगार, गावात विविध शिबिरे राबविण्यात आली , नागरिकांना सर्वच गरजा पूर्ण केले आहेत, वेळोवेळी महिलांचे मेळावा घेऊन त्यांच्या सर्व समस्या ऐकून त्या सोडवण्याचा केलेले प्रयत्न, गावात स्मशानभूमी ,नाली बांधकाम, सांडपाणी व्यवस्थापन, सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते, जनावरांविषयी असलेली आपुलकी, जनावरांसाठी घेतलेले विविध कॅम्प, गावातील शेतकऱ्यांसाठी विविध कॅम्प, गावातील व्यायाम शाळा, वाचनालय, यासाठी असलेले योगदान, यामुळे गावाचा चेहरा मोहरा बदलला असून या सर्वच गोष्टींच्या आधारावर त्यांना आज सन्मानित करण्यात आले आहे.



