“मेळघाट पॅशन ट्रेल” उपक्रम नागपुर येथे उद्घाटन; अंबाबारवा अभयारण्यात इन्फ्लुएन्सर्सना जैवविविधतेचा अनोखा अनुभव…
👉जंगल सफारी, आदिवासी बांधवांची परंपरा , संस्कृती आणि महिला बचत गटांचा प्रेरणादायी उपक्रमांचे कौतुक; जंगल सफारी, पार्क पर्यटनाला नवी चालना

युवा महाराष्ट्र11 न्युज
(प्रभुदास पारस्कार )
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने आयोजित ‘मेळघाट पॅशन ट्रेल’ या उपक्रमाचे उद्घाटन नागपुर येथे करण्यात आले, या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना मेळघाटच्या नैसर्गिक सौंदर्याचा, समृद्ध जैवविविधतेचा आणि स्थानिक आदिवासी जमातींच्या परंपरा , संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव याद्वारे घेण्यात आला . या स्तुत्य उपक्रमांतर्गत 29 व 30 मार्च रोजी विविध राज्यांतील इन्फ्लुएन्सर्स अंबाबरवा अभयारण्यात दाखल झाले. या सर्वांचे वनपरीक्षेत्र अधिकारी अजय बावणे (सोनाळा) यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. दोन दिवसांच्या मुक्कामादरम्यान इन्फ्लुएन्सर्सनी निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सातपुडा पर्वत रांगातील अंबाबरवा अभयारण्य , जंगल सफारीचा आनंद घेतला, सदर उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला तसेच वसाली संकुल येथे वनकर्मचाऱ्यांशी मनसोक्त संवाद साधत मेळघाटच्या अंबाबरवा अभयारण्याची नैसर्गिक जीवनशैली, वन्यप्राणी , विविध प्रकारच्या पक्षी व इतर बरीचशी माहिती जवळून ओळख करून घेतली. यावेळी इको पार्कमधील महिला बचत गटांद्वारे चालविण्यात येणाऱ्या भोजन कॅन्टीनमध्ये भोजनाचा आनंद घेत इन्फ्लुएन्सर्सनी महिला बचत गटाच्या माध्यमातून यशस्वी उद्योजकतेचे विशेष कौतुक केले. स्थानिक पातळीवर महिलांनी आपल्या उभारलेला हा यशस्वी उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मत व्यक्त करत सर्वांनी कौतुक केले. यावेळी मा.उपवनसंरक्षक राहुलसिंह टोलिया (DCF), मा.सहाय्यक वनसंरक्षक जी.पी. टेकाळे (ACF), मा.वनपरीक्षेत्र अधिकारी ए.एन. बावणे (सोनाळा), वनपाल जी.टी. सोळंखे, एस.डी. राठोड यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थितीत किम असवानी (बंगळुरू), तनवीर देसाई (गोवा), गोकुल दास व मनोज पी. एम. (केरळ) या इन्फ्लुएन्सर्सनी सहभाग नोंदवला. “मेळघाट पॅशन ट्रेल ” या उपक्रमामुळे मेळघाटातील पर्यटनाला नवी दिशा व चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून, नैसर्गिक वनसौंदर्य वारसा आणि स्थानिक संस्कृती देशभर पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपुर्ण ठरणार आहे.



