महाराष्ट्र बारी ब्रिगेडच्या बुलडाणा जिल्हा अध्यक्षपदी वैभव डाबरे यांची निवड

( प्रभुदास पारस्कर ) युवा महाराष्ट्र11 न्यूज
महाराष्ट्र बारी ब्रिगेडच्या बुलडाणा जिल्हा अध्यक्षपदी संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते वैभव डाबरे यांची सर्वानुमते नुकतीच निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र बारी ब्रिगेड ही बारी समाज बांधवांचे संघटन त्यांच्या हिताचे रक्षण करणे , विकासासाठी तसेच समाजाच्या न्याय हक्कासाठी लोकचळवळ म्हणून स्थापन असलेल्या बारी ब्रिगेडचे संस्थापक प्रल्हादराव दातार, तसेच राज्य सल्लागार डॉ अशोक भुते यांच्या उपस्थितीत सर्वानुमते बुलडाणा जिल्हा अध्यक्षपदी वैभव डाबरे यांना दि. 04 एप्रिल रोजी वरवट बकाल येथील संघटनेच्या कार्यालयात नियुक्ती पत्र देऊन त्यांचे अभिनंदनाचा वर्षाव करत कौतुक करण्यात आले यावेळी बारी ब्रिगेडचे पदाधिकारी सह बारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .




