Uncategorized

शिक्षण क्षेत्रातील सन्मानाचा सुवर्णक्षण ; उपक्रमशील शिक्षक श्री देविदास बावस्कार सर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित..

युवा महाराष्ट्र11 न्युज
(प्रभुदास पारस्कार )
संग्रामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा रुधाना येथील शिक्षक श्री देवीदास बावस्कर सर “आदर्श शिक्षक सेवा सन्मान ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
महाराष्ट्र शिक्षक पॅनल (MSP) आयोजीत भव्य पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री भार्गवी चिरमुले दिग्गज मान्यवरांच्या हस्ते श्री देविदास बावस्कार सर यांना ‘आदर्श शिक्षक सेवासन्मान 2026’ प्रदान करण्यात आला .
जिल्हा परिषद मराठी शाळा रुधाना येथील कर्तव्यशील श्री देविदास बावस्कार सर यांनी आपल्या नाविन्यपूर्ण आणि विद्यार्थी-केंद्रीत उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कलागुण कौशल्य वाढीसाठी आवश्यक उपक्रम राबविणे यामुळे शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारे उपक्रमशील शिक्षक श्री देविदास बावस्कार सर यांच्या कार्याची दखल घेत नुकताच पार पडलेल्या अत्यंत भव्य सोहळ्यात यथोचित सन्मान करण्यात आला. सदर पुरस्कार सोहळा महाराष्ट्र शिक्षक पॅनल (MSP) आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्कार 2026 नयनरम्य सोहळा दिनांक 12 मे 2026 रोजी श्री साईबाबा संस्थानचे सांस्कृतिक भवन शिर्डी येथे कला, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील दिग्गजासह सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वीपणे पार पडला . यावेळी श्री बावस्कार सर यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे शिक्षण वर्तुळातून त्यांच्यावर कौतुकासह शुभेच्छा वर्षाव होत आहे.
सोहळ्यातील प्रमुख सन्मानकर्ते व अतिथी भार्गवी चिरमुले सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री
, रोहित शिंगे सुप्रसिद्ध कवी, श्रीमती गुंजन पाटील , प्रमुख अतिथी श्री दीपक चामे अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षक पॅनल (MSP) ,
श्री भास्कर डोसे राज्य समन्वयक, महाराष्ट्र शिक्षक पॅनल (MSP) ,
बुलढाणा जिल्हा विशेष उपस्थितीने प्रेरणादायी सोहळ्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे (MSP) बुलढाणा जिल्हा समन्वयक श्री अनिल धनभर , श्री मनोहर खंडेराव आणि श्री हरिहर मानकर यांनी विशेष उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
श्री देविदास बावस्कार सरांनी आपल्या कल्पक उपक्रमांमधून शाळेचा आणि विद्यार्थ्यांचा जो विकास साधला आहे, त्याचीच पोचपावती म्हणजे हा राज्यस्तरीय सन्मान आहे. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल आणि गौरवाबद्दल श्री देविदास बावस्कार सर परिसरासह सर्वत्र कौतुकांसह शुभेच्छांचा वर्षा होत आह .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close