Uncategorized

अवैधरित्या देशीदारू वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक ; सोनाळा पोलीसांची धडक कारवाई..

बिग बॉस 5000 कंपनीचे दारूचे 08 बॉक्स , दुचाकीसह 1 लाख 2 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त...

( प्रभुदास पारस्कार )

संग्रामपूर तालुक्यातील टुनकी- लाडणापुर रस्त्यावर सोनाळा पोलिसांची 09 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या अंधारात धडक कारवाई अवैध्यपणे देशी दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक,1 लाख 2 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .
सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दारूबंदी कायदे अंतर्गत प्रोव्ही रेड करून धडक कारवाई करण्यात आली . सदर कारवाई दखलपात्र कायम गुन्हा क्र . 41/2026 कलम 65 (अ) (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला . पोकॉ राहूल रमेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सविस्तर असे कि 9 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या अंधारात 08 ते 08:45 च्या सुमारास टुनकी- लाडणापुर मुख्य रस्त्यावर सोनाळा पोलिसांनी प्रोव्ही रेड दरम्यान दोन इसम दुचाकीवरून अवैधरित्या देशी दारूचे बॉक्स वाहतूक करताना आढळून आले . पोलिसांनी तपासणी केली असता दोन निळसर रंगाच्या थैलीमध्ये बिग बॉस 5000 कंपनीचे 90 मिली चे 08 बॉक्स मिळून आले . प्रत्येकी बॉक्स मध्ये 90 मिलीच्या 100 शीश्या अशा एकूण 800 शीश्या मिळून आल्या प्रत्येकी शिशी किंमत 40 रुपये प्रमाणे 32000 रुपयाचा देशी दारूचा माल मिळून आला तसेच अवैध देशी दारू वाहतूकीसाठी वापरलेल्या एका विना नंबर प्लेट काळ्या रंगाची युनिकॉन मोटरसायकल अंदाजे किंमत 70 हजार रुपये असा एकूण 01 लाख 02 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपी नामे 1) ओंकार पुंडलीक फुन्से वय 53 वर्ष 2) लोकेश रमेश सुलताने वय 29 वर्षे दोन्ही राहणार जामोद ता .जळगाव जिल्हा बुलढाणा अटक करण्यात आला . त्याप्रमाणे वर नमूद मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेण्यात आला . सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव खोने पोहेकॉ विनोद वानखडे, पोकॉ विनायक इंगळे, पोकॉ राहुल पवार, पोकॉ लक्ष्मण डोके, यांच्या पथकाने ही कारवाई केली . पुढील तपास सोनाळा पोलीस स्टेशन ठाणेदार संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोहेकॉ विनोद वानखडे करीत आहे . या कारवाईमुळे अवैधरित्या देशीदारू वाहतुक व विक्री करणाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close