Uncategorized
अल्पवयीन विद्यार्थिनी क्लासला जात असताना बसमध्ये विनयभंग केल्याप्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
सोनाळा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी सह दोघांना केली अटक

प्रभुदास पारस्कार :-
संग्रामपूर तालुक्यातील एका गावातील विद्यार्थीनीं शेगाव या बसने क्लासला जात असताना हात धरून विनयभंग केल्याची प्रकरणी चौघांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला .
सविस्तर असे की महाविद्यालयीन 16 वर्षीय विद्यार्थिनी शेगाव येथे क्लासला जात असताना 8 जुन रोजी सकाळी 10:00 ते 12:30 दरम्यान गावापासून-शेगाव पर्यंत प्रथमेश सुरेश महल्ले व तीन मित्रासह पाठलाग करत बस मध्ये प्रथमेश महल्ले याने त्या विद्यार्थिनीला स्पर्श करून व उजव्या हात पकडून विनयभंग केला . तसेच तीन सहकारी मित्रांनी फिर्यादीचा मोटरसायकल ऑटो व बसणे पाटलांग करत मुख्य आरोपी यास वरील कृत्य करण्यास सहकार्य केले . या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून
दखलपात्र कायमी क्र. 163/2026 कलम 74, 75, 78, 49, 3(5) BNS सह कलम 8,12,17 पोक्सो 2012 अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलीसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी प्रथमेश सुरेश महल्ले रा. शेलु ता. बार्शीटाकळी व कृष्णा संतोष गावंडे रा. भेडगाव ता. बार्शीटाकळी या दोघांना अटक करण्यात आले असून पोलीस दोघांच्या मागावर आहेत . मुलींचा पाटलाग करून छेड व त्रास देणे या वाढत्या घटनांमुळे मुलींचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येत असून पालकांमध्ये मोठी चिंता व्यक्त होत आहे . याप्रकरणी पुढील तपास सोनाळा पोलीस स्टेशन ठाणेदार मा.सपोनि संदीप काळे करीत आहेत .




