सामाजिक

सोनाळा ग्रामपंचायतीत ‘धना सेठ ’ च्या नावाखाली गावकरी यांची फसवणूक “

सोनाळा ग्रामपंचायत चे अनेक प्रकरणे उजीडात येणार

सतिश वानखडे

(युवा महाराष्ट्र प्रतिनिधी बुलढाणा) 

      संग्रामपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून सोनाळा ग्रामपंचायत नावारूपाला आली आहे. तरी गेल्या दोन महिन्यापासून समस्त गावकरी व ग्रामपंचायत सदस्य  यांनी मासिक सभेचा ठराव घेऊन गावातील विशिष्ट लोकांनाच ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून मेहरबान झाल्याचे चित्र दिसत आहे.

     सोनाळा ग्रामपंचायत अंतर्गत मोठ्या संख्येत मोलमजूर करणारे व समस्त जाती धर्म चे लोक एकोप्याने  सोनाळा ग्रामपंचायत अंतर्गत राहतात. व मध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी गावे सुद्धा समाविष्ट आहे. यामध्ये सालवन,पिंगळी जहागीर,रोहन खिडकी, चुनखडी, गुमठी, इत्यादी गावांचा समावेश ग्रामपंचायत मध्ये येतो यामध्ये  आदिवासी नागरिक व लोकांचा कुठलाही विचार ग्रामपंचायत मध्ये कर्मचारी म्हणून करण्यात आलेला नाही. व त्यांना याची जाणही नाही तरीही गावचा सरपंच हा कुण्या विशिष्ट लोकांचा व धर्माचा नसून सर्व नागरिकांना समानतेचे वागणूक देणारा असावा याची जाण करून देणारी सोनाळा ग्रामपंचायत ची ग्रामसेवक  यांनी का सांगितले नाही. यामध्ये काही पैशाचा अपहर्त झालेला नसेल ना असा प्रश्न समस्त गावकरी वासी यांना पडला आहे ! सोनाळा वासी या प्रकरणा विषयी प्रशासनाला जाब विचारत आहे. प्रशासनाने सोनाळा ग्रामपंचायत कडे या विषयावर चुपी का साधली आहे. यामध्ये भ्रष्ट अधिकारी व सरपंच यांच्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न समस्त गावकरी हे विचारत आहे .

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close