Uncategorized

सोनाळा येथे “महाराजस्व समाधान” शिबीरामध्ये एकाच छताखाली 311 लाभार्थ्यांना थेट लाभ…

प्रभुदास पारस्कार :-

युवा महाराष्ट्र11 न्युज

संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे 14 मार्च शुक्रवार रोजी “महाराजस्व समाधान” शिबिराचे आयोजन यशस्वीपणे संपन्न झाले .
राज्य शासनाच्या ‘महाराजस्व समाधान शिबिरा’तून सर्वसामान्य नागरिकांना एकाच छताखाली विविध शासकीय योजना लाभ , सेवा उपलब्ध होत असून नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तालुकास्तरावर वेग वेगळ्या गावात “महारास्व समाधान” शिबिराद्वारे शासकीय योजनांचा व विविध प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे कार्य ,गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. ग्रामीण भागातील गाव खेड्यातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी वारंवार चकरा मारण्याची गरज भासू नये,नाहक होणारा त्रास यासाठी याद्वारे शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. असे मनोगतात व्यक्त करतांना आमदार डॉ. संजय कुटे यांनी आज दिनांक 14 मार्च रोजी सोनाळा येथे “महाराजस्व समाधान” शिबिर कार्यक्रमात केले. सोनाळा येथील श्री संत सोनाजी महाराज मंगल कार्यालयात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानांतर्गत विशेष शिबिराचे आयोजन तहसील कार्यालय संग्रामपूर, महसूल मंडळ सोनाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीर अभियान राबविण्यात आले . यावेळी मा. आमदार डॉ. संजयजी कुटे यांच्या हस्ते धनादेश वितरीत करण्यात आले . उमेद ग्रामसंघ सोनाळा यांना 3 लक्ष रुपये , जागृती ग्रामसंघ हदिया महल यांना 3 लक्ष रुपये एकविरा ग्रामसंघ सायखेड यांना 3 लक्ष रुपये धनादेशाचे वाटप करण्यात आले . शिबिरामध्ये मंडळ महसूल विभाग मार्फत सातबारा 124 , सातबारा दुरुस्ती 43 , आठ अ 119 , फेरफार 37 , प्रलंबित फेरफार , विविध प्रमाणपत्रे 72 , कृषी विभाग 35 अशा विविध क्षेत्रातील प्रकरणे निकाली काढण्यात आले, सेतू विभाग मार्फत जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र उत्पन्न दाखले वाटप , पुरवठा विभागामार्फत शिधापत्रिका दुरुस्ती अर्ज स्वीकारले, सामाजिक विभागामार्फत निराधार योजनांचे अर्ज स्वीकारण्यात आले , श्रावणबाळ योजना व विशेषसहाय्य योजना मार्फत लाभ मंजूर करण्यात आला, कृषिविभाग मार्फत विविध योजनांची माहिती देण्यात आली . त्यामध्ये काही फळबाग योजना, महाविस्तर AI-APP, पी एम किसान योजना, गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजना मार्फत लाभार्थी निवडण्यात आले, आरोग्य विभागामार्फत आयुष्यमान भारत कार्ड वाटप , रुग्णाची तपसणी करण्यात आली, वंदना योजना कार्ड वाटप करण्यात आले, ग्रामपंचायत सोनाळा मार्फत जन्म दाखले, मृत्यू दाखले वाटप , घरकुल महाआवास अभियान अंतर्गत निधी वाटप करण्यात आला, लेक लाडकी विभागामार्फत लेक लाडकी योजना व मातृवंदना योजना बद्दल मार्गदर्शन करण्यात आले . भूमिअभिलेख विभागामार्फत तक्रारी स्वीकारण्यात आल्या,
यावेळी शिबिराला मा. शैलेश काळे उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद, मा. प्रशांत पाटील तहसीलदार संग्रामपूर, मा.माधव पायघन गटविकास अधिकारी संग्रामपूर , मा.रमेश जाधव तालुका कृषी अधिकारी, मा.अजय बावणे वनपरिक्षेत्र अधिकारी सोनाळा, सपोनि संदीप काळे ठाणेदार सोनाळा , माजी जि प सदस्य प्रमोद खोद्रे सर्व विभागाचे अधिकारी ,कर्मचारी, विविध योजनांचे लाभार्थी ,परिसरातील व मंडळातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

युवा महाराष्ट्र11 न्युज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close