Uncategorized

काटेल धाम येथे दिव्यांग वधु-वर मेळावा संपन्न…

350 दिव्यांगांचे नोंदणी ;दोन जोडप्यांची जुळलेली लग्नगाठ

प्रभुदास पारस्कार :-
युवा महाराष्ट्र11 न्युज
   संग्रामपूर तालुक्यातील काटेल (धाम ) येथे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लॉईड बुलढाणा,बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी म. बुलढाणा,श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशन जळगांव जामोद व श्री संत गुलाबबाबा संस्थान काटेल धाम तसेच दिव्यांग क्रांती संघटना रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन 13 फेब्रुवारी शुक्रवार रोजी करण्यात आले होते . तब्बल 350 अंध, मुकबधिर, अस्थिव्यंग , सर्वसाधारण दिव्यांग यांनी विदर्भासह राज्यभरातून विविध जिल्ह्यातून या ठिकाणी येऊन आपल्या हक्काचा जोडीदार मिळावा, त्यांच्या सामाजिक पुनर्वसनास चालना मिळावी आणि आयुष्याला नवीन उमेद मिळावी या उद्देशाने परिचयमेळाव्यात सहभागी झाले , या परिचय मेळाव्यांमध्ये शारीरिक व मानसिक ज्यामुळे त्यांच्या जीवनात त्यांच्या आयुष्यात सुसह्यता यावी या साठी संग्रामपूर तालुक्यात पहिल्यांदाच अशा व्यक्तींना हक्काचा जोडीदार मिळावा व त्यांचे जीवन उज्वल व्हावे करीता भव्य मेळाव्याचे आयोजन यशस्वीरीत्या पार पडले . दिव्यांग वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते
या मेळाव्याला अध्यक्ष नॅशनल असो. फॉर द ब्लॉईड व संस्थापक अध्यक्ष बुलढाणा अर्बन श्री राधेश्याम चांडक ,डॉ. सौ अपर्णाताई कुटे ,महाराष्ट्र राज्य, नाशिक रामेश्वर कलंत्री,उपाध्यक्ष बुलढाणा अर्बन डॉ. किशोर केला ,सहा. संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग बुलढाणा मनोज मेरत , अध्यक्ष दिव्यांग क्रांती संघटना रायगड बी.जी.पाटील ,अध्यक्ष मानस फाऊंडेशन बुलडाणा प्रा.डी.एस. लहाने,श्रीक्षेत्र चांगेफळ संस्थान चांगेफळ ता.संग्रामपूर रामभारती महाराज, जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी जि.प. बुलढाणा प्रमोद येंडोले, श्री संत गुलाबबाबा संस्थान काटेल धाम अध्यक्ष नरेंद्र पालांदुरकर,
दिव्यांग क्रांती संघटना विदर्भ अध्यक्ष
अशोक तायडे, नेत्र चिकित्सक जळगांव जामोद डॉ.नंदू तायडे ,
सचिव बांधकाम समिती श्री संत गुलाब बाबा संस्था काटेल धाम सचिव
मनीष कोळपकर,
तसेच बुलडाणा अर्बन व सहकार विद्या मंदिर समस्त कर्मचारी
यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्याग वधू-वर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला दीव्यांग व्यक्तींच्या आयुष्याला नवीन उमेद मिळावी यासाठी त्यांचे उज्वल जीवनासाठी बुलढाणा अर्बन चे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी मनोगत व्यक्त केले तसेच आधी मान्यवरांनी देखील आपले यथोचित मार्गदर्शन केले .
याच वेळी मान्यवरांची उपस्थिती दोन दिव्यांग जोडप्यांची ऋणबंध गाठ या परिचय मेळाव्याच्या व्यासपीठावर जुळली यावेळी उपस्थितीत मान्यवरांनी त्या जोडप्यांचे येतोचीत सत्कार करण्यात आला .
​सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वरवट बकाल येथील इयत्ता नववीचा विद्यार्थी प्रणव विजय सैरीसे याच्यावर नियतीने घाला घातला. शेतातून येताना बैलगाडीवरून पडून झालेल्या अपघातात त्यांच्या आईचे, सौ. लक्ष्मी सैरीसे यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या  कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेल्या या दुःख प्रसंगी शाळेच्या वतीने मदतीला धावून आला .
भाईजींच्या हस्ते त्यांचे वारस विजय सैरीसे यांना 1 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक भविष्यासाठी संस्थेने दिलेला हा आधार अत्यंत भावनिक ठरला .
तसेच बुलढाणा अर्बन शाखा वरवट बकाल येथील मयत सभासद राजेंद्र नरसिंगराव देशमुख मुक्काम पोस्ट वानखेड यांचा मृत्यू विद्युत  तारेच्या धक्क्याने  झाला असून त्यांच्या वरील असलेलं कर्ज-वेअर हाऊस तारण कर्ज 506649/- अक्षरी पाच लाख सहा हजार सहाशे एकोनपन्नास रुपये चा धनादेश राधेश्याम चांडक यांच्या हस्ते देण्यात आला कार्यक्रमाला अपर्णाताई कुटे तसेच प्रमुख उपस्थिती रामकृष्ण मस्के, वसंतराव चिंचोले, दिलीप नागरिक ,अशोक तायडे, नंदू तायडे, मनीष कोळपकर, बीजी पाटील, प्राध्यापक डी. एस. लहाने, नरेंद्र पालंद्रीकर, श्री रामभारती महाराज, राजेंद्र ठाकरे, भैयाभाऊ बकाल, घनश्याम राठी . कमल गाधी ,पत्रकार बांधव जिल्हाभरातून आलेले प्रतिष्ठित मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. परिचय मेळाव्याचे संचालन प्राचार्य योगेश घाटोळे, प्रा.राजीव पुंडे यांनी केले यावेळी प्राचार्य राजेश लोहिया, प्राचार्य प्रकाश भुते, अमित धूत तसेच बुलडाणा अर्बन शाखा व्यवस्थापक  भूपेंद्र अवचार, संतोष केला, राजेश गांधी, शाम देवकर, मनोज गांधी आदींनी अथक परिश्रम घेतले परिचय मेळाव्याला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती .
. .

युवा महाराष्ट्र11 न्युज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close