महाकाल ग्रुपच्या वतीने महाशिवरात्री निमित्त सोनाळयात महाप्रसादाचे वाटप….
महाकाळ भक्ताकडून प्रवाशीयांना उसळ व केळी चहा वाटप

महाकाल ग्रुपच्या वतीने महाशिवरात्री निमित्त सोनाळयात महाप्रसादाचे वाटप….
सतिशकुमार वानखडे (युवा महाराष्ट्र न्यूज बुलढाणा )
:दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त सोनाळा बस स्थानकावर फराळ वाटप करून उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
श्री संत सोनाजी महाराजांच्या पावन भूमी असलेल्या सोनाळा नगरीत महाकाल ग्रुपच्या वतीने सोनाळा बस स्थानक परिसरात महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाकाल भक्तांनी भगवान शंकरांच्या मूर्तीचे पूजन व महाआरती केली. परिसर “हर हर महादेव”च्या जयघोषाने दुमदुमून गेला.
त्यानंतर उपस्थित भाविक व प्रवाशांना फराळाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात अनेक मान्यवर, ग्रामस्थ व शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पार पडला.
महाशिवरात्री निमित्त आयोजित या उपक्रमामुळे सामाजिक ऐक्य व भक्तीभाव वृद्धिंगत झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. अनेक भाविकांनी अन्नदान, फळवाटप, पाणी वितरण तसेच श्रमदानाच्या माध्यमातून योगदान दिले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन शिरोळकर, शाम बोरपी, सतिश वानखडे, हर्षल खंडेलवाल, शंकरनाथ विश्वकर्मा, विनोद राठोड, ललित सावळे, सोपनील देशमुख, पंजाब धारपवार, सोनाजी कोठे, मयूर उंडे, अंकुश तायडे, राज लव्हाले, अमर बागळे, राजू डांगे तसेच गावातील नागरिकांनी विशेष प्रयत्न केले.



