शैक्षणिक

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त भव्य संयुक्त समारंभ व प्रेरणादायी मार्गदर्श,न शिबिर संपन्न

सोनाजी नगरमध्ये विचारांची ज्योत प्रज्वलित!

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त भव्य संयुक्त समारंभ व प्रेरणादायी मार्गदर्श,न शिबिर संपन्न

शाम बोरपी                                                                                                                                                                                 सोनाळा (प्रतिनिधी )श्री संत सोनाजी महाराज संत भूमी सोनाळा येथील   जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सोनाजी नगर सोनाळा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने भव्य संयुक्त समारंभ व विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार, दि. १६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सुमेध भाऊ दामधर होते, तर उद्घाटन श्री. संदीप काळे सर (ठाणेदार) यांच्या शुभहस्ते झाले. प्रमुख वक्ते म्हणून श्री. प्रा. भिमराव परघरमोर (शिव–शाहू–फुले–आंबेडकर विचारधारा) यांनी उपस्थितांना शैक्षणिक, वैचारिक व व्यक्तिमत्त्व विकासाबाबत सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. “सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाची सुरुवात माता सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी श्री. भिमराव वानखडे सर (केंद्र प्रमुख, सोनाळा) यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवली, तर श्री. दिनकर चांदूरकर सर यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास श्री. सतीश वानखडे (शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, जि.प. उच्च प्राथमिक कन्या शाळा सोनाळा), सौ. पद्माताई वावरे (ग्रामपंचायत सदस्य), श्री. निलेश लहासे (सक्षम न्यूज चॅनल विशेष प्रतिनिधी), श्री. सिद्धार्थ बोदडे (सामाजिक कार्यकर्ते), श्री. शेख असलम सर (उर्दू शाळा सहाय्यक शिक्षक), सौ. पुनम वानखडे (शाळा व्यवस्थापन समिती सदस्य), श्री गजानन बावणे सर सहाय्यक शिक्षक, श्री सागर भामद्रे सर सेवेकरी शिक्षक, श्री गोरखनाथ डांगे शिपाई, श्रीमती मंजुराबाई बावस्कार शालेय पोषण आहार सेविका, प्रकाश नाईक, गजानन डांगे, संतोष पवार, सुरेश मेसरे, योगेश बावस्कार, रमेश मेसरे, किशोर राऊत, गजानन मेहनकार यांच्यासह अनेक मान्यवर, शिक्षकवृंद, गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळ, पालकवर्ग व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. भगवान बावणे सर (वरिष्ठ शिक्षक, सोनाजी नगर) यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालकवर्ग व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे व महान व्यक्तिमत्त्वांच्या विचारमंथनामुळे हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी व संस्मरणीय ठरला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close