शैक्षणिक

नवोदय प्रवेश परीक्षेत विद्यार्थिनीचे घवघवीत यश

जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक कन्या शाळा सोनाळा शाळेचा मान उंचावला

जिल्हा परिषद कन्या शाळा सोनाळा येथील कृष्णाली मोहन गावंडे जिल्हास्तरीय यादीत 49 वा क्रमांक

सतिशकुमार वानखडे

सोनाळा (ता. संग्रामपूर): नवोदय प्रवेश परीक्षा 2026 मध्ये जि.प. मराठी उच्च प्राथमिक कन्या शाळा, सोनाळा येथील विद्यार्थिनी कु. कृष्णाली मोहन गावंडे हिने 100 पैकी 95% गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे तिची जिल्हास्तरीय निवड यादीत 49 वा क्रमांक मिळवून निवड झाली असून शाळेचा आणि गावाचा अभिमान वाढवला आहे.
या यशाबद्दल शाळेत विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यार्थिनीच्या या यशामागे तिची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.
याचबरोबर शाळेतील इतर विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट कामगिरी केली असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शाळेच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
“मेहनत, जिद्द आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठे यश मिळवू शकतात,” असे मत शिक्षकांनी व्यक्त केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close