जळगाव(जा) नगरपरिषद वर भाजपचा झेंडा..
भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गणेश दांडगे यांचा दणदणीत विजय .

प्रभुदास पारस्कर :_
जळगाव जा प्रतिनिधी
जळगाव(जा) नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 चा निकाल आज 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आला. तर जळगाव (जा) न.प. निवडणुकीमध्ये माजी मंत्री आमदार डॉ.संजय कुटे यांच्या मार्गदर्शनात भाजपने दणदणीत विजय मिळाला आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गणेश दांडगे 7 हजार 580 मते घेऊन निवडून आले आहेत . त्यांनी अपक्ष उमेदवार संजय पारवे यांचा 1167 मतांनी पराभव केला तर काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार गजानन सुर्यवंशी हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. तर 10 प्रभागातील 21 सदस्यांपैकी 09 सदस्य भाजपचे निवडून आले आहेत, यापैकी काही सदस्य मोठ्या फरकाने निवडून आले आहे. त्यामुळे न.प.ची निवडणुक भाजपने एकहाती जिंकल्याचे दिसुन येत आहे. विजयानंतर भाजपा पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते व फटाक्यांची आतिषबाजी करून मोठ्या आनंदात जल्लोष साजरा करण्यात आला . जळगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025
नगराध्यक्ष भाजपाचे गणेश रामेश्वर दांडगे
एकूण नगरसेवक 21
पक्षीय बलाबल
भाजपा विजय उमेदवार :- 09
1) पुष्पा प्रभाकर अंबडकार
2) रूपाली संतोष डोबे
3) कैलास मोतीराम पाटील
4) राजू मारुती हिस्सल
5) प्रियंका उमेश येऊल
6) लता कृष्णराव तायडे
7) सुनीलसिंग राजपालसिंग रघुवंशी
8) परमानंद करणसिंग राजपूत
9) खान शिरीन खानम
नगराध्यक्ष पदाचे गणेश रामेश्वर दांडगे यांच्या सह
भाजपाचे 09 उमेदवार विजयी झाले
काँग्रेस विजयी उमेदवार :- 05
1) फरजाना बी सय्यद अफरोज
2) वैशाली निलेश तायडे
3) मीना राजेश सातव
4) संगीता विलास भारसाकळे
5) समीना परवीन शाकीर
एआयएमआयएम चे दोन उमेदवार विजयी
1) वाजिदा अंजुम अब्दुल जहीर
2) शेख गुलाब शेख भिकारी
–वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत 1 उमेदवार विजयी
1)मोहम्मद सलीम मोहम्मद शब्बीर
राष्ट्रवादी (श पवार गट) दोन उमेदवार विजयी झाले आहे .
1)खान इरफान हमीदभाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गणेश दांडगे यांचा दणदणीत विजय .
2) सिद्धार्थ गजानन हेलोडे
हे विजयी झाले आहेत..
राष्ट्रवादी (अजित पवार गट) एकमेव उमेदवार विजय झाले
1)मोहम्मद अतीकुर रहमान मोहम्मद
तर समाजवादी पार्टीचे 1)सय्यद नफीस सय्यद शफी हे एकमेव उमेदवार निवडून आले आहेत.



