भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस तथा हिंदुसेवक अँड अमोल अशोकराव अंधारे यांचा भाजप जिल्हा चिटणीस व प्राथमिक सदस्य पदांचा राजीनामा.
सर्व मार्गदर्शक नेते ,सहकारी कार्यकर्ते तथा हितचिंतकांचे मानले आभार..
प्रभुदास पारस्कार खामगांव प्रतिनीधी :-
अँड श्री अमोल अंधारे यांनी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व परिवारातील विविध संघटनांमध्ये कार्यरत होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद अशा हिंदुत्वादी राष्ट्रप्रेमी संघटनांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या योग्यरीत्या सांभाळत संघटनात्मक कार्य केले. या प्रवासात त्यांना स्व. भाऊसाहेब फुंडकर, स्व. सुभाषराव देशपांडे, स्व. अरविंदजी नेटके,स्व. प्रल्हादजी बगाडे, स्व. ज्ञानेश्वरजी शर्मा, स्व. सुभाषजी शर्मा, श्री नानाभाऊ कोकरे, तसेच विद्यमान नेतृत्वातील आमदार श्री चैनसुख संचेती आमदार श्री संजय कुटे, कामगार मंत्री मा. फुंडकर, श्री सागर फुंडकर, श्री शेखर पुरोहित, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री सचिन देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर नेत्यांचे मार्गदर्शन लाभले. मा.श्री आकाश फुंडकर यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवत ऑक्टोम्बर 2024 मध्ये त्यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून त्यांना जिल्हा चिटणीस म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.
मात्र काही कारणांमुळे त्यांनी स्वेच्छेने राजीनामा देण्याचा हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.
“माझ्या संपूर्ण सामाजिक व वैचारिक प्रवासात मला अनेक वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन व भारतीय जनता पार्टी चा सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते मातृशक्ति यांचे खूप प्रेम व सहकार्य मिळाले त्यांची परतफेड मी जीवनात करू शकत नाही आज सर्व जागी भाजपा ची एक हाती सत्ता असताना राजीनामा देण्याची वेळ येत असल्याची तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची गेल्या वर्षभरात भेट झाली नाही किंवा विनंती करूनही कुणी जेष्ठ नेत्यांनी त्यांची भेट करून दिली नाही याची खंत मनात आहेच व राहिल परंतु कोणा विषयीही मनात कोणतीही तक्रार नाही. पक्ष, संघटना व विचार परिवारासाठी काम करण्याची संधी मिळाली, याचा मला अभिमान आहे. भविष्यातही मी राष्ट्रहित व समाजहिताच्या कार्याशी वैचारिकदृष्ट्या जोडलेलाच राहीन,”]
असे अँड अमोल अंधारे यांनी सांगितले.
त्यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष तथा मा.मुख्यमंत्री साहेब अशा सर्व नेतृत्वाला लेखी स्वरूपात देण्यात आली असून, मार्गदर्शक नेते, सहकारी कार्यकर्ते, व हितचिंतकांचे सर्वांचे आभार मानले आहेत.




