सुरक्षितेसोबतच संवेदनशीलतेचा संदेश देणारा सोनाळा पोलिसांचा सामाजिक उपक्रम..
नागरिकांच्या जीवितवाची सुरक्षेची काळजी घेणारा हा उपक्रम ; पोलीस वर्दीतील काळजी घेणारा कर्तबगार दर्दी माणूस
दुचाकी धारकांना संरक्षणात्मक तार कवच लावून देताना ठाणेदार संदीप काळे व पोलीस कर्मचारी
संग्रामपूर प्रतिनीधी प्रभुदास पारस्कार :-
सोनाळा पोलीसांचा सुरक्षितेसोबत संवेदनशीलतेचा संदेश देणारा समाजहिताचा उपक्रम राबविण्यात आला .सर्वत्र मकर संक्रांतिच्या या पावन पर्वावर पतंग उडवण्याची आध्यात्मिक परंपरा जोपासत शारीरिक मानसिक आणि भावनिक फायदे देणारा हा दिवस मोठ्या आनंदाने पतंग उत्सव म्हणून साजरा केला जातो . मात्र आजच्या काळात या सर्व गोष्टीचा विसर पडला असून कौशल्य व शक्ती प्रदर्शन म्हणून पशु ,पक्षी व मानवी जीवितवास धोकादायक ठरणारे नायलॉन मांजाचा वापर करून पंतग उडविले जातात . यादरम्यान
नायलॉन मांजामुळे दुचाकी धारकांच्या जीवाला व होणाऱ्या धोक्यांची दखल घेत सोनाळा पोलीस स्टेशनच्या वतीने एक अत्यंत स्तुत्य व समाज हिताचा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमांतर्गत नायलॉन माझ्यापासून होणारे अपघात टाळण्यासाठी दुचाकी वाहनासाठी ताराचे संरक्षणात्मक कवच म्हणून पोलीसांच्या वतीने लावून देण्यात आले . विशेषतः हे ताराचे संरक्षण कवच पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या हाताने बनवून दुचाकी धारकांना मोफत बसवून देण्यात आले. सदर उपक्रमात ठाणेदार संदीप काळे यांच्या नेतृत्वाखाली खुफिया विभाग पोकॉ विनोद शिंब्रे, पोकॉ राहूल पवार, पोकॉ गणेश राठोड, पोकॉ महादेव शिपे, पोकॉ संदीप पवार, पोकॉ संदीप सुसर व चालक विनायक इंगळे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी झाले . कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी व आपले कर्तव्यचे पालन करत सामाजिक बांधिलकीही जपत नागरिकांच्या जीवितत्वाद सुरक्षेची काळजी घेणारा हा उपक्रम पोलीस वर्दीतील मानुस नात्यातील संवेदनशीलतेचे उत्तम उदाहरण ठरला आहे. सोनाळा पोलीस स्टेशनच्या या पुढाकारामुळे नागरिकांमध्ये समाधान व सुरक्षितेची भावना निर्माण झाली असून या समाज उपयोगी व मानवतावादी स्तुत्य उपक्रमाबद्दल सोनाळा पोलीस स्टेशनचे सुज्ञ नागरिकांनी कौतुक केले .तसेच कर्तव्यदक्ष
सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे त्यांचे पथक टुनकी , बावनबीर , लाडणापुर, वसाडी ,सोगोडा परीसरातील खेड्या गावांमध्ये जाऊन मांजाचा वापर व विक्री करणाऱ्यावर करडी नजर ठेवून असुन पतंग उडवणाऱ्या लहान मुलांना मांजापासून होणारे पशु पक्षी व मानवी जीवित्वास धोका व दुष्परिणाम समजावून सांगितले तसेच विविध माध्यमांद्वारे सोनाळा पोलीसांच्या वतीने मांजा वापर व विक्री करणे कायद्याने बंधनकारक गुन्हा आहे . लहान मुलांना घेऊन देऊ नये तसेच विक्री किंवा खरेदी करीत असेल तसेच व्यक्ती किंवा लहान मूले नायलॉन मांजाने पतंग उडवित असेल तर तात्काळ पोलीसांना माहीती द्या असे आवाहन वेळोवेळी करण्यात येत आहेत .

brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 40;



