सामाजिक

आई – बाप उमगले अश्रूचे बांध फुटले……..!

हंकारे यांच्या भावनिक संवाद शाब्दिक हुकाराने अंतर्मनात पेटली माणुसकीची ठिणगी

व्याख्यान:जीव गेला तरी चालेल, बापाला मान खाली घालावी लागेल असे वागू नका; बापाच्या घामाची किंमत जाणून घ्या, वसंत हंकारे यांचे आवाहन‎….

सतिशकुमार वानखडे 

बुलढाणा ( प्रतिनिधी ) मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वावटळात आई – बापालाच बाजूला सारलेल्या मुला-मुलींना आज आई – बाप अन त्यांच्या कष्टाची जाणीव झाली. निमित्त होते समाज परिवर्तन तथा परिसरातील चालू असलेल्या मुल – मुली हे वडिलांपासून दुरावा, घर सोडून पळून जाणाऱ्या मुलांन करिता वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाचे, त्यांच्या सवादातून बाहेर पडलेल्या भावनिक हुंकाराने मुलासह उपस्थित सर्वांनाच आईबाप उमगले अन आपोआप अश्रूचे बांध फुटू लागले.

 त्यांच्या प्रत्येक शब्द उपस्थित त्यांच्या काळजाला  भिडला आणि त्यांच्या अंतर्मनात माणुसकीच्या ठिणगीने पेट घेतला. सोनाळा येथील बस स्थानक जवळ असलेल्या बापू स्टेडियमवर  तब्बल दीड तास त्यांनी संवाद शैलीने उपस्थित हजारोंना खिळवून ठेवले. आई- बाप समजून घेताना या विषयावर बोलताना त्यांनी उपस्थिताना कधी विनोदी शैलीने हसविले तर भावनिक शब्द फेकीने रडवलेसुद्धा मुला मुली ला यशस्वी तेच्या शिखरापर्यंत नेण्यासाठी आई-बाबा चे योगदान त्याग कष्ट शारीरिक व मानसिक झीच संघर्ष उलगताना प्रत्येकालाच आईबाप उमगले. आई बापा विषयी वसंत हंकारे यांच्या भावनिक सादाने विद्यार्थी, विद्यार्थिनी पालक नागरिकांच्या अंतर्मनाचा ठाव घेत घेतला, व्याख्यानाची अखेरची भावनावंश क्षणानेच झाली. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या बापाला घट्ट मिठी मारण्याचे आव्हान वसंत हंकारे यांनी मुलांना केले. या मिठीतून मुलींच्या अश्रूची बापाच्या भिजलेल्या खांदा पाहून उपस्थित सर्वांच्याही  अश्रूचे बांध फुटले.
         श्री संत सोनाजी महाराज पावनभूमी मध्ये  घेण्यात आलेल्या वसंत हंकारे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन प्रसंगी वसंत हंकारे यांचे जिल्हा परिषद कन्या शाळा सोनाळा यांच्यावतीने लेझीम पथकात स्वागत करण्यात आले. व 23 वर्षे देश सेवा करणाऱ्या अनिल वानखडे यांचे निवृत्त सत्कार समारंभ पार पडला व सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे यांनी आपल्या शाब्दिक बोलीतून मुला मुलींचे देव आईबाप असल्याचे पटवून दिले. या कार्यक्रमाचे  भारदार तसेच मुला मुलींना स्तब्द ठेवणारे सूत्रसंचालन  गजानन नेमाडे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक  संतोष दाभाडे  आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सतीश वानखडे यांनी  समस्त गावकरी व पोलीस स्टेशन  च्या वतीने सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी परिसरातील तसेच इतर जिल्ह्यातून  सुद्धा आपल्या मुला मुलींना मायबाप घेऊन येतांचे चित्र बघायला मिळाले. या कार्यक्रमासाठी समस्त गावकरी यांनी परिश्रम घेतल्याचे समजते.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close