Uncategorized

निमखेडी/वरवट(ब) येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा शोक-सांत्वन दौरा; स्मार्ट मीटर मोठा घोळ सरकारला घेरले…

विद्युत स्मार्ट मीटर मोठा घोळ ;कथित घोटाळ्याचा पर्दाफास केल्याशिवाय मागे हटणार नाही.हर्षवर्धन सपकाळ

युवा महाराष्ट्र11न्यूज

✍️(प्रभुदास पारस्कार)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवार, 12 जुलै रोजी वरवट बकाल आणि निमखेडी गावांचा दौरा करून शोकाकुल कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
यावेळी त्यांनी सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या निमखेडी येथील माजी सभापती भारतसिंग भाटिया यांचे काही दिवसापूर्वी दुखत निधन झाले होते . भारतसिंग भाटिया एक पक्षनिष्ठ म्हणुन ओळख होती त्यांचे आदिवासी भागातील केलेले कार्य मोलाच  योगदान आहे . काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन नातेवाईकांशी संवाद साधून सांत्वन करत निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना त्यांना धीर दिला. तसेच टुनकी येथील शाहू फुले आंबेडकर सार्वजनिक वाचनाला चालती भेट दिली यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत वाचनालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला व जळगाव जामोद मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षनेत्या स्वातीताई वाकेकर यांनी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांसाठी दिलेल्या पुस्तकांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले . दौऱ्यादरम्यान टुनकी येथे माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारच्या स्मार्ट मीटर योजनेवर जोरदार टीका केली.
त्यांनी आरोप केला की गोरगरिबांच्या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस सरकार सामान्य नागरिकांच्या खिशावर दरोडा टाकण्याचे काम करत आहे. सरकारचा प्रत्येक निर्णय भ्रष्टाचार डोळ्यासमोर ठेवून घेतला जात आहे. ते म्हणाले की स्मार्ट मीटर योजना हा खूप मोठा घोटाळा आहे आणि त्याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे.
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या मुद्द्यावर संपूर्ण राज्यात व्यापक आंदोलन उभारेल आणि या कथित घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याशिवाय मागे हटणार नाही. त्यांनी राज्य सरकारकडे जनहितार्थ स्मार्ट मीटर योजनेवर तातडीने पुनर्विचार करण्याची तसेच जनतेच्या हिताविरुद्ध घेतलेले निर्णय मागे घेण्याची मागणी केली. यावेळी श्री. प्रकाश अवचार पाटिल अध्यक्ष बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी, डॉ. सौ. स्वातीताई वाकेकर पक्षनेत्या जळगाव जामोद मतदारसंघ, श्री. अविनाश उमरकर, डॉ . संदीप वाकेकर ,श्री. राजेंद्र वानखडे , श्री प्रकाश देशमुख , अत्ताऊल्ला पठाण सर, श्री. प्रकाश बाप्पू देशमुख, श्री. संजय ढगे, श्री. धर्मेंद्र इंगळे, सचिन पालकर , अरुण निंबोळकार ,
अँड भालेराव, कैलास देशमुख, सतीश टाकळकर, ज्ञानेश्वर शेजोळे, शालिग्राम हागे, मोहन रौंदळे, हुसेन पालकर, प्रशांत गावंडे, शाम डाबरे, प्रमोद पाटील, गणेश टापरे, अजय अग्रवाल, प्रकाश साबे, सचिन पालकर, बळीराम धुळे, गुड्डू सावळे, योगेश बाजोड, शेख अफरोज, गणेश खिरोडकार, अमोल घोडस्वाल, आकाश बोरसे, सोपान वेरुळकर, स्वप्निल देशमुख, साहेबराव बोदडे, ज्ञानेश्वर पाटील व काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच इतर अनेक आदिवासी बांधवांसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close