Uncategorized

सोनाळा येथील पीएम श्री जि प मराठी शाळेचे दणदणीत यश ; 6 विद्यार्थी IMO दुसऱ्या फेरीसाठी पात्र, 33 विद्यार्थ्यांना सुवर्ण विजेतेपद..

विद्यार्थ्यांच्या या यशामागे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.गुलाबराव खरात व प्राथमिक शिक्षणाधिकारी मा.विकास पाटील यांची भूमिका महत्वपूर्ण आहे .

संग्रामपूर प्रतिनीधी प्रभुदास पारस्कार : –

        संग्रामपूर तालुक्यातील पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा सोनाळा येथील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय मॅथ्स ऑलिम्पियाड (IMO) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेतील 6 विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरले असून तब्बल 33 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिकदृष्ट्या या यशामुळे शाळेचे नाव जिल्हास्तरावर झळकले आहे.
IMO परीक्षेच्या दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी 1) यश संतोष दाभाडे इयत्ता सातवी 2)आयुष वाढे इयत्ता सहावी 3)साहिल शहादेव भामद्रे इयत्ता सहावी 4)आनंद नंदकिशोर इंगळे इयत्ता पाचवी 5) श्रीहरी गणेश राहणे इयत्ता पाचवी 6) नक्ष गणेश गावंडे इयत्ता चौथी या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामागे आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे मा .मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबरावजी खरात यांचे स्पर्धा परीक्षांबाबतचे प्रेरणादायी मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले आहे. तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी मा.विकास पाटील यांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शनातून जिल्हा परिषद शाळांमध्ये IMO, NSO सारख्या ऑलिम्पियाड परीक्षांची तयारी सुरू करण्यात आली, ज्याचे फलित म्हणजे आज सुवर्ण दिवस दिसून आले. संग्रामपूर तालुका मा.गटशिक्षणाधिकारी (BEO) दीपक ताले यांनीही आपल्या योग्य नियोजन, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार केले. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळेच शाळेला सुवर्ण यश मिळाले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका कु.बोपटे मॅडम यांनी शिक्षकांकडून उत्तम काम करून घेत विद्यार्थ्यांना योग्य दिशा दिली. सर्व वर्ग शिक्षकांनी शाळेच्या नियमित वेळेव्यतिरिक्त विशेष वर्ग घेऊन विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली. त्यांच्या या परिश्रमाने विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखविली आणि सुवर्ण कामगिरी करून दाखवली आहे.
आज जिल्हा परिषद शाळा सारख्या शाळांमध्ये आणि तेही ग्रामीण भागातील शाळेतही ऑलिम्पियाड सारख्या आंतर्राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांची तयारी होत आहे, ही बाब शिक्षण क्षेत्रात प्रेरणादायी आहे. या यशामुळे“जिल्हा परिषद शाळा म्हणजे केवळ सामान्य शिक्षण” ही धारणा खोडून निघाली आहे. विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत नवे स्वप्न, पालिकांच्या मनात नवा विश्वास आणि शिक्षकांच्या मेहनतीला नवे बळ मिळाले आहे. म्हणूनच आज सर्व स्तरातून पीएम श्री जि प शाळा सोनाळा चौफेर कौतुकाचा वर्षाव होत आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थी, पालक, शिक्षकवृंद व शाळा व्यवस्थापनाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

युवा महाराष्ट्र11 न्युज
युवा महाराष्ट्र11 न्युज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close