Uncategorized

बुद्ध पौर्णिमेच्या लखलखत्या चंद्र प्रकाशनात तिन बिबट, नऊ पट्टेदार वाघांसह 690 वन्य प्राण्यांची नोंद…

अंबाबरवा अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री 9 पट्टेदार वाघ , 03 बिबटे , 17 अस्वलासह 690 प्राण्यांची नोंद ;निसर्ग अनुभव कार्यक्रमात निसर्गप्रेमींचा मोठा सहभाग..

 

युवा महाराष्ट्र11 न्युज (प्रभुदास पारस्कार )
    संग्रामपूर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीतील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या अंबाबारवा अभयारण्य शुक्रवारी बुद्ध पौर्णिमेच्या रात्रीच्या लख्खप्रकाशात निसर्ग अनुभव कार्यक्रम 30 पानवट्यावर 30 मचान तयार करून 11 मचान निसर्गप्रेमींना तर 19 मचान वन कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले होते . त्यावरती वरवट (बकाल) येथील जेष्ठ पत्रकार भाऊ भाजने व , सोनाळा, टुनकी , अमरावती , अकोला , बुलढाणा व बैतुल या जिल्ह्यातील निसर्गप्रेमींनी ऑनलाइन व ऑफलाइन  नोंदणी करून निसर्ग अनुभव कार्यक्रमात सहभागी होत जंगलातील अनुभव प्रत्यक्ष घेतला .मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत अंबाबरवा अभयारण्य 9 पट्टेदार वाघांसह 690 वन्य प्राण्यांनी दिले दर्शन यावर्षी अभयारण्यात बरेच वन्य प्राणी निदर्शनास आले नाही त्यामुळे नोंदी परीणाम झाला परंतु गतवर्षी झालेल्या नोंदणी पेक्षा यावर्षी वन्यप्राणी नोंदीमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली असून बरेचसे प्राणी दिसले नसले तरीही मोठी नोंद झाली यामध्ये चोसिंगे , तळस , चितळ , लांडगा, लंगूर , कोल्हा, सायळ व खार या सारखें बरेच वन्यप्राणी दृष्टीतही पडले नाही .
   सदर निसर्ग अनुभव कार्यक्रम मा. उपवनसंरक्षण मेळघाट व्याघ्र प्रकल्प आकोट यांच्या मार्गदर्शनाखाली सोनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी मा. अजय बावणे यांच्याकडून संपुर्णपणे उत्कृष्ट तयारीनिशी निसर्ग अनुभव कार्यक्रम यशस्वीत करण्यात आला . काही नैसर्गिक व कृत्रिम पानवट्यावर 30 मचान उभारण्यात आले होते त्यातील 11 मचान वर निसर्गप्रेमी व सोबत एक वनकर्मचारी तर उर्वरित 19 पानवट्यावरील मचान सोनाळा परीक्षेत्रातील वनपाल , वनरक्षक व वनमजूर निसर्ग अनुभव वन्यप्राणी गणना कार्यक्रमात सहभाग घेतला होता .
    निसर्ग अनुभव उपक्रम 2026 अशी पार पडली प्राणीगणना
अंबाबारवा अभयारण्यातील पानवाट्यावर मचान उभारण्यात आले .एका मचानावर 1 निसर्गप्रेमी व 1 वन कर्मचारी बसले होते . 1 मे शुक्रवारी दुपारी 02:00 ते 02 मे शनिवारी सकाळी 09:00 वाजेपर्यंत पानवट्यावर येणाऱ्या प्रत्येक वन्य प्राण्यांची नोंद घेण्यात आली .

    2023, 2024 व 2025 प्राणी गणनेच्या तुलनेत यावर्षी 01 मे 2026 अंबाबारवा अभयारण्यात 9 वाघांसह 690 वन्य प्राण्यांची नोंद झाली 2023 च्या 517 प्राणी गणनेच्या तुलनेत 01 मे 2026 रोजी झालेल्या निसर्ग अनुभव उपक्रमात मोठ्या संख्येने वाढ होत  690 मोठी वन्य प्राण्यांची नोंद झाली आहे .                                    त्यात 04 पिल्लांसह पट्टेदार वाघ 09, बिबट 03 , अस्वल 17 , निलगाय 51, सांबर 87, भेडकी 20, गवा 46, रानडुक्कर 79, माकड 208, मसन्या उद 03, रान कोंबडी 38, रान मांजर 08 , मोर 90 , ससा 20, रान कुत्रा 10 व  मुंगुस 01 अशा प्रकारे निसर्ग अनुभव कार्यक्रमांमध्ये  या प्राण्यांची नोंद झाली .

2023 मध्ये 
वन्य प्राण्यांची नोंद आतापर्यंत सर्वाधिक ठरली होती त्यावेळी  3 वाघ ,3 बिबटे ,12 अस्वल ,54 नीलगाय ,37 सांबर ,15 भेडकी ,65 रानगवे ,48 रानडुक्कर ,51 लुंगर ,116 माकडे ,20 रान कोंबडी ,3 रान मांजर ,85 मोर ,5 ससे ,1 सायाळ असे एकुण 517 वन्य प्राण्यांची नोंद झाली होती .
2024 मध्ये 
त्यामध्ये 2 वाघ ,10 अस्वल ,26 नीलगाय ,29 सांबर , 11 भेडकी ,12 रानगवे ,37 रानडुक्कर ,1 लुंगर ,111 माकड ,2 मसन्याउद ,5 रान कोंबडी ,74 मोर ,4 ससा ,2 रानकुत्रा ,1 मुंगूस , 4 चोसिंगे असे एकुण 2024 मध्ये 331 वन्य प्राण्यांची नोंदणी झाली होती .
तर 2025 मध्ये
 बुद्ध पौर्णिमेच्या रात्रीच्या चंद्राच्या शितल प्रकाशात 2 वाघ ,7 अस्वल ,28 नीलगाय ,39 सांबर , 10 भेडकी , 31 रानगवे ,24 रानडुक्कर , 30 लुंगर ,163 माकड , 14 मसन्याउद ,30 रान कोंबडी , 55 मोर , 3 ससा  , 5 मुंगूस , 10 रानमांजर, 4 सायळ, 1 साप , 2 चांदी अस्वल व 3 बिबटे असे एकुण 461 वन्यप्राण्यांची नोंद झाली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close