Uncategorizedक्राइम

गांजा व मुद्देमालासह एकास अटक 57 हजाराचा मुद्देमाल जप्त ; बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई .

 

(प्रभुदास पारस्कार)

  • बुलढाणा :-
    मिशन परिवर्तन अंतर्गत अवैधरित्या अमली पदार्थ बाळगणारा एका इसमास स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पथकाला मुद्देमालासह पकडण्यात यश मिळाले . 23 नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा, बुलडाणा चे पथक बुलडाणा उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना जय हॉटेल जवळ गोंधनखेड शिवार पो. ठाणे बुलढाणा ग्रामीण हददीत संशयीरीत्या एक इसम दिसुन आला . सदरील व्यक्ती नामे गणेश मेरसिंग साबळे वय 42 वर्ष रा. तरोडा, तारापुर रोड, ता. मोताळा जि. बुलढाणा हा त्याचे ताब्यातील लाल रंगांचे बजाज कंपनीची डिस्कवर मोटार सायकलचे हॅन्डलला नायलॉन थैली बाळगतांना संशयीतरित्या हालचाली करताना दिसुन आल्याने एन.डी.पी.एस कायद्याच्या तरतुदींचे पालन करुन नमुद इसमाची व त्याचे ताब्यातील मोटर सायकल वरील नायलॉन थैलीची पंचासमक्ष झडती घेतली असता नायलॉन थैलीत हिरवट, काळसर, कळीदार बिजा असलेला गांजा वजन 2 किलो 50 ग्रॅम एकुण प्रति किलो वजनी दराने 20,000/-रु. प्रमाणे एकुन 41,000/- रु. गांजा अंमली पदार्थ तसेच त्याचे खिशात एक जिओ भारत कंपनीचा मोबाईल कि. अंदाजे 1000/-रु. व गुन्हा करण्याकरीता वापरलेली बजाज कंपनीची डिस्कव्हर मोटार सायकल जिचा क्रं. MH28AK 1891 चेचीस क्रं. MD2A57AZ7EWM06867 सदर दुचाकीची अंदाजी किंमत 15,000/- रुपये असा एकुन 57,000/- रुपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष ताब्यात घेवुन जप्त करण्यात आला आहे. नमुद इसमाच्या विरुध्द व इतर 01 आरोपीविरुद्ध स्थानिक पो. ठाणे बुलढाणा ग्रामीण येथे एन.डी.पी.एस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    सदरची कामगिरी श्री. निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री अमोल गायकवाड, श्री. सुनिल अंबुलकर पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि अविनाश जायभाये, पोहेकॉ दिपक लेकुरवाळे, विजय पैठणे, पोना सुनिल मिसाळ, अनंत फरताळे, पोकॉ गजानन गोरले, अमोल वानरे, चापोका निवृत्ती पुंड, रवि भिसे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी पार पाडली .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close