Uncategorized
माळेगाव येथील पी एम श्री जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सचिन ठोंबरे सर यांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित ; महाराष्ट्र शिक्षक पॅनेलचा उपक्रम

तेल्हारा (प्रतिनिधी):
तालुक्यातील पीएम श्री जिल्हा परिषद शाळा माळेगाव(बाजर ) येथील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे आणि शैक्षणिक कार्यात सकारात्मक बदल घडवून आणणारे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सचिन ठोंबरे यांना यावर्षीचा “आदर्श शिक्षक सेवा सन्मान” राज्यस्तरीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य शिक्षक पॅनेल (एमएसपी) च्या वतीने १२ मे रोजी शिर्डी येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात हा गौरव करण्यात आला.
पुरस्कार सोहळ्याचे स्वरूप
हा मानाचा पुरस्कार सचिन ठोंबरे यांनी पत्नीसह (सपत्नीक) मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्याला गती देणे, शाळेत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविने आणि शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणे, या सर्व बाबींचा व इतर कार्याची दखल घेऊन शिक्षक फाउंडेशन महाराष्ट्र व निवड समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
अनेक मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला लाभल प्रमुख अतिथी म्हणून
भार्गवी चिरमुले सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री ,
रोहित शिंगे प्रसिद्ध कवी ,
दीपक चामे अध्यक्ष, महाराष्ट्र शिक्षक पॅनेल ,
भास्कर डोसे राज्य समन्वयक ,
श्रीमती गुंजन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते .
याप्रसंगी ओमप्रकाश उगले, श्याम पाठक, भास्कर डोसे सर, अनिल धनगर, मनोहर खंडेराव, हरिहर मानकर (जिल्हा समन्वयक) यांच्यासह राज्यातील शिक्षक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सचिन ठोंबरे सर यांना हा “आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार सपत्नीक प्रदान करून सन्मानित करण्यात आले . सचिन ठोंबरे सर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल परिसरातून सर्वत्र कौतुकासह शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .

“विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राबवलेल्या उपक्रमांची पावती म्हणजे हा पुरस्कार आहे. यामुळे भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.”
— सचिन ठोंबरे सर (पुरस्कार विजेते मुख्याध्यापक) पीम श्री जिल्हा परिषद मराठी केंद्रीय शाळा माळेगाव(बाजर)



