क्राइम

खोटी माहिती देऊन डायल 112 वर पोलिसांना बोलावणे भोवले; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

आपत्कालीन सेवेचा गैरवापर करणाऱ्याला सोनाळा पोलिसांचा दणका

  1. खोटी माहिती देऊन डायल 112 वर पोलिसांना बोलावणे भोवले; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

सतिश व्ही वानखडे

सोनाळा | प्रतिनिधी

सोनाळा पोलीस स्टेशन अंतर्गत डायल 112 या आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेवर खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 20 जुलै 2026 रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास लाडणापूर येथील राजू रामभाऊ भालतडक यांनी डायल 112 वर खोटी माहिती देऊन पोलिसांना घटनास्थळी बोलावले. संबंधित माहिती खोटी असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध अदखलपात्र नोंद क्र. 246/2026 अन्वये कलम 212, भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कारवाई करण्यात आली.या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल कैलास सांगळे यांनी फिर्याद दिली असून, पोहेकॉ विनोद वानखडे हे पुढील तपास करीत आहेत. ही कारवाई सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.यावेळी सोनाळा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, डायल 112 ही आपत्कालीन सेवा केवळ खऱ्या आणि तातडीच्या प्रसंगासाठीच वापरावी. खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close