रेझिंग डे “पोलीस वर्धापन दिन” सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम..

संग्रामपूर प्रभुदास पारस्कार :-
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस स्टेशन यांच्यावतीने “पोलीस वर्धापन दिन” सप्ताहानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न . सोनाळा पोलीस स्टेशन अंतर्गत बावनबीर येथील इंदिरा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन सोनाळा यांच्यावतीने 07 जानेवारी रोजी रेझिंग डे “पोलीस वर्धापन दिन” सप्ताहानिमित्त विशेषतः विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन येथील दैनंदिन कामकाज व इतर माहिती देण्यात आली .पोलिसांची विविध हत्यारे तसेच त्याचा उपयोग ,कायदेविषयक माहिती व सुरक्षितेविषयी मार्गदर्शन मा. ठाणेदार संदीप काळे यांनी केले . पोलीस विभागाकडून राबविले जाणारे “पोलीस दीदी पोलीस काका” उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना जनजागृती करण्यात आली .यावेळी दामिनी पथक. “गुड टच ,बॅट टच” तक्रारी संदर्भात गोपनीय तक्रार कशी करायची , पोस्को कायद्याअंतर्गत बालहक्क व संरक्षण , डायल 112 या आपत्कालीन सेवेबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप काळे सविस्तर माहिती व मार्गदर्शन केले यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक महादेव खोने , पोकॉ विनोद शिंब्रे व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांकडून सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली .



