पुन्हा अपघात टळला ; सोनाळा – बुलढाणा एसटी बस अडकली बावनबीर पुलाजवळ मोठा अनर्थ टळला
बावनबीर येथील रखडलेल्या पुलाच्या कामामुळे अपघाताची पुनरावृत्ती सदैव जीवितहानी टळली

संग्रामपूर प्रभुदास पारस्कर :-
सोनाळा येथून बुलढाण्याकडे जाणारी सकाळची एसटी बस बावनबीर येथील इंदिरा गांधी शाळेजवळ सुरू असलेल्या पुलाच्या रखडलेल्या कामाजवळ अडकली. त्यामुळे मोठा अपघात टळला असून प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला.जळगाव (जामोद) आगाराची बस क्रमांक MH14BT4532 सोनाळा – बुलढाणा जाणारी बस पहाटे साडेसहा वाजता दरम्यान रखडलेल्या पुलाजवळ मोठा अपघात होताना टळला .
या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून पुलाचे काम रखडलेले अवस्थेत आहे. या कामामुळे देण्यात आलेला पर्यायी मार्ग चुकीचा, अरुंद व धोकादायक असून योग्य दिशादर्शक फलक, बॅरिकेड्स व प्रकाशव्यवस्था नसल्याने वारंवार अपघात घडत आहेत. आतापर्यंत अनेक नागरिकांना गंभीर दुखापती झाल्या असून काही दुर्दैवी घटनांमध्ये मृत्यूही झाला आहे.
इतक्या गंभीर घटना घडूनही संबंधित बांधकाम विभाग व प्रशासन कुंभकर्णी निद्रावस्थेत असल्याने अद्यापही ठोस उपाययोजना करत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे व कुंभकर्ण निद्रेत नागरिकांच्या जीवत्वाची व सुरक्षेची पर्वा नसल्याचे स्पष्ट दिसून येते . नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, तोपर्यंत योग्य व सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून होत आहे.
वेळीच लक्ष न दिल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.




