जिल्हा परिषद कन्या शाळा येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पत्रकार पारितोषिक व देश सैनिक सेवानिवृत्त समारंभ उत्साहात संपन्न…..
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम पुरस्कर शाळा सोनाळा नावारूपाला

सतिशकुमार वानखडे (युवा महाराष्ट्र न्यूज बुलढाणा )
सातपुड्याच्या कुशीत असलेल्या संत नगरी सोनाळा येथील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अग्रेसर असलेली मुलींची शाळा येथे नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा तसेच देश सेवा करणाऱ्या सैनिकांचे व पत्रकारांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम व पारितोषिक वितरण सोहळा अत्यंत उत्साहात 13 फेब्रुवारी रोजी कन्या शाळा येथे पार पडला . कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पत्रकार संघाचे अध्यक्ष परलाद दातार, प्रल्हाद सावतकार, व सोनाळ्याचे सरपंच हर्षल जी खंडेलवाल, केंद्रप्रमुख भीमरावजी वानखडे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा अध्यक्ष सतिश वानखडे इतर मान्यवर सुद्धा हजर होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि मा जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या पूजनाने तसेच वंदनेने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या मध्ये प्रथम महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आगमनापासून कार्यक्रमाची कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पारंपारिक लोकनृत्य, नाटिका, आणि देशभक्तीपर गीतांनी प्रेक्षकांची मने जिंकली, स्नेहसंमेलनाचा इव्हेंट होताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व इतर साधनांचा उपयोगाच्या माध्यमातून बदलानुसार कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमाच्या उत्साहाच्या संमेलनात अनेक थोर महापुरुष यांचे पोवाडे व वेशांतरे पाहून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात मने विचलित झाली यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत अनेक मुलींनी आपले कलागुणांना वाव दिली आहे.
पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक क्रीडा आणि कला क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्या ंचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. तसेच कार्यक्रमाचे आकर्षण ठरलेले 23 वर्ष देश सेवा करणारे अनिल भाऊवानखडे यांच्या देशसेवा निवृत्त सत्कार समारंभ हा भारत माता की जय या जयघोषणात पार पडला.
कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुण्यांने संग्रामपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रल्हाद दातार यांनी आपल्या भाषणात वार्षिक स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तित्व विकास साठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक गजानन नेमाडे यांनी उपस्थित त्यांचे तसेच पत्रकार व देशसेवक व शाळा समिती सदस्य यांचे आभार मानले, सांस्कृतिक कार्यक्रम पारितोषिक वितरण आणि सर्वांच्या सहभागामुळे हे स्नेहसंमेलन एक अविस्मरणीय सोहळा ठरला चे अध्यक्ष सतिश वानखडे च्या वतीने सांगण्यात आले.
तरी जिल्हा परिषद शाळे च्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार प्रल्हाद सावकार, अशोक अकोटकार, शेख मतीन, कैलास खोटटे, शेख रफिक, डॉक्टर दाभाडे, सुनील बावणे, तसेच शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य गण तसेच गावातील समस्त पालक वर्ग या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होता.



