Uncategorized
नदी पात्रा नजीकच्या शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान ; मदतीसाठी जिल्हा मुख्यालय पायपिट…

प्रभुदास पारस्कार :- संग्रामपूर ता वि प्र
👉वानखेड येथील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तालूका ते जिल्ह्य प्रशासनात धुळखात
संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील भाग 2 शिवारात नदीपात्रा नजीकच्या सहा शेतकऱ्यांच्या शेतातील सुपीक माती खरडून पूर्ण शेतात फक्त वाळू-दगड धोंडे शिल्लक राहले आहेत. तर शेतातील विहिरीत पाण्या ऐवजी गाळ साचला आहे. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांच्या जमिनीचे नुकसान झाले आहे.त्यातच शेतकऱ्यांची शेतीवर उपजीविका असल्याने यावर्षीची अतिवृष्टी व 16 ऑगस्ट 2025 रोजी वाणधरणाच्या व पुराच्या पाण्याने संपूर्ण शेती खरडून गेली व शेतात दगड धोंडे साचून शेतीतील पिकांचे होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे स्वप्न हिरावून घेतले आहे.
दरम्यान गेल्या 3 महिन्या पासून लोकप्रतिनिधी ते जिल्हा प्रशासनापर्यंत शेतकऱ्यांनी सारखी पायपीट केली. मात्र अखेर पायपीट होत असलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही प्रशासनाकडुन कसलाही दुजोरा मिळाला नाही . स्थानिक तलाठी, ग्रामसेवक यांनी सर्व्हे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनामे अहवाल तहसिलदार संग्रामपूर यांच्याकडे सादर करण्यात आला . मात्र सानुग्रह अनुदान अपात्र ठरविल्याप्रमाणे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची थठ्ठा केली जात आहे..नुकसान ग्रस्त कुटूंबाचा उदरनिर्वाह थांबला आहे . वानखेड येथील शांताबाई मोहन बंड,विश्वनाथ येणकर, आशिष बदरखे, ,अशोक बदरखे,राजू छळकर व प्रल्हाद भारसाकडे हे ६ शेतकरी हवालदिल झाले आहे . स्थानिक ग्रामपंचायत, तालूका महसूल तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात पायपीट करून प्रशासन नुसते एकमेकांकडे बोट दाखवून टोलवाटोलवी करित आहे .
30 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना नैसर्गिक आपत्ती मधून मदत करण्याचे निवेदन दिले असून निवेदनात नदीकाठी पूर संरक्षक भिंत बांधण्याची मागणी याआधी अनेक वेळां या शेतकऱ्यांनी केली आहे . मात्र दुर्दैवाने या कडे लक्ष न देता परीणामी आज पाहता या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्यावर सुद्धा प्रशासन हेतूपरस्पर डोळे झाक करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे . तर या शेतकऱ्यांकडे पाठ फिरवून नगर


विकासाची चाहूल बाळगत निवडणूकीत मशगुल असलेल्या लोकप्रतिनिधी सुद्धा या शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला सध्या वेळ नाहीये .
अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांना शेवटी उरला तो फक्त आत्महत्येचा पर्याय आहे . संकटग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी संतप्त झालेल्या शेतकरी करत आहेत .



