Uncategorized
सोनाळा पोलीसांची अवैध गोवंश कत्तल करणाऱ्यावर धडक कारवाई ; दहा हजाराच्या मुद्देमालसह एक आरोपी अटक..

युवा महाराष्ट्र11 न्युज
(प्रभुदास पारस्कार)
संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथे सोनाळा पोलीसांची अवैधपणे गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली .
मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, यांनी वेळोवेळी गुन्हेपरिषद दरम्याण बुलढाणा जिल्हयात कोठेही गोवंश जनावरांची कत्तली होणार नाही याबाबत सतर्क बाळगण्यासह कार्यवाही करणेबाबत आदेशीत केले होते, त्याप्रमाणे पोलीस स्टेशन सोनाळा हद्दीतील ग्राम बावनबिर येथे चोरून लपुन सुरू असलेल्या गोवंश जातीचे जनावरांच्या कत्तली बाबत गुप्त माहीती मिळाला त्याआधारे सोनाळा पोलीस पथकाने धाड टाकून कार्यवाही करण्यात आली, सविस्तर असे की 14 मे 2026 रोजी गुप्त बातमीदाराने बातमी दिली की, ग्राम बावनबिर येथे अवैधरित्या गोवंश जातीचे जनावरांची कत्तल सुरू आहे, अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने सपोनि संदिप काळे यांनी पोलीस पथकासह ग्राम बावनबिर येथे तात्काळ रवाना होऊन बातमी प्रमाणे, शेख नईम शेख रहीम वय 45 वर्ष रा. बावनबिर यांचे घरी पंचासमक्ष छापा मारला असता सदर व्यक्ती त्याचा घरासमोरी ओसरीमध्ये एक गोवंश जातीचे जानावरांची कत्तल करुन गोमास विक्री करण्याचे उद्देशाने गोवंश मास बाळगतांना मिळुन आला .
गोवंश जातीचे जनावराचे मास 42 कि. ग्रॅ. अंदाजे किंमत 8400/- रुपये, गोमास कापण्याकरीता वापरलेले एक लोखंडी कुऱ्हाड लाकडी दांडा असलेली अंदाजे किंमत 200/- रुपये , गोमास कापण्याकरीता वापरलेले दोन लोखंडी सुरे अंदाजे किंमत 400/- रुपये ,गोवंश जातीचे जनावरांची चामडी अंदाजे किंमत 1000/- रुपये ,एक नायलॉन दोरी अंदाजे 00/- रुपये असा एकुण 10,000/- रुपये चा मुद्देमाल सदर आरोपींच्या ताब्यात मिळून आला . सदर प्रकरणी पोस्टे सोनाळा येथे शेख नईम शेख रहीम वय 45 वर्ष रा. बावनबिर यांचे विरुध्द अपराध क्रमांक. 134/2026 कलम 325 भारतीय न्याय संहीता 2023 सहकलम 5 (क), 9 (अ) पशु संरक्षण अधिनिय 1976 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाही करीता ताब्यात घेण्यात आले असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, अपर पोलीस अधिक्षक खांमगाव श्री.डॉ श्रेणिक लोढा, श्री. आनंद महाजन, उपविभागिय पोलीस अधिकारी मलकापुर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि संदिप काळे, पोहेकॉ संजय पवार, विनोद शिंब्रे, शाकिर पटेल, पोकों राहुल पवार, कैलास सांगळे, गणेश मोरेखडे, परमेश्वर तितरे यांनी केली आहे .



