जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा आलेवाडी येथे बाल आनंद मेळावा साजरा

प्रभुदास पारस्कार संग्रामपूर प्रतिनिधी
संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी ग्राम आलेवाडी येथे 20 जानेवारी रोजी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठीचा “खरी कमाई” या उपक्रमांतर्गत बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या बाल आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ स्वतः बनवून व्यावसायिक दृष्टीने त्यांची मांडणी करून आपले दुकान थाटले आणि गावातील गणमान्य नागरिक , विद्यार्थी पालकांनी या आनंद मेळाव्यात सहभागी होत आनंद मेळाव्याचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य व ग्रामपंचायत उपसरपंच , सदस्य तसेच गावातील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उद्घाटनाची फीत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.अशपाक सुरत्ने व उपसरपंच श्री.इर्शाद सुरत्ने यांचे हस्ते कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी समितीचे सदस्य श्री.संदीप केदार, सामजिक कार्यकर्ते श्री.युनुस सुरत्ने श्री. मुसा भाऊ सुरत्ने त्यांच्यासह काही कार्यकर्ते आणि गावातील ज्येष्ठ नागरिक यांची सुद्धा उपस्थिती दर्शवत त्या सर्वांनी शाळेला सदिच्छा भेट दिली.उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सुद्धा बाल आनंद मेळाव्याचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.नफिस सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.गव्हाड सर यांनी केले.त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभाग होऊन आनंद मिळवला. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी मुख्याध्यापक श्री. शाह सर यांचे मार्गदर्शन लाभले तर श्री.सोनाने सर व श्री.वराडे सर तसेच श्री इमाम घट्टे यांनी मोलाचे सहकार्य केले..




