सोनाळा बस स्थानकावर चालते-फिरते स्वच्छालयाची चुकीची जागा; प्रवासी व महिलांना गैरसोयीचा सामना ,
सोनाळा ग्रामपंचायत ने जनतेच्या लाखो रुपयाची उधळण .. चालते-फिरते स्वच्छालय आणण्या मागे कोणाचा फायदा

सतिश व्ही वानखडे
संग्रामपुर प्रतिनिधी
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा ग्रामपंचायत अंतर्गत बस स्थानक परिसरात ठेवण्यात आलेल्या चालते-फिरते स्वच्छालयाच्या जागेबाबत प्रवासी व ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेविका यांनी महिला स्वच्छालय विषयी जागा नियोजन न करता गावाचे लाखो रुपये व्यर्थ खर्च केले या मध्ये लाखो रुपयाचे स्वच्छालय आणण्या मागे कुठलाही विचार करण्यात आला नाही व काही दिवसा आंधी स्वच्छलय विषयी बावनबीर रस्तावर ते एका बाजूला ठेवावे अशी मागणी असताना ते थातूर मातुर कार्यवाही करत स्वच्छालय हे प्रवासी निवार्याेच्या मध्यभागी ठेवण्यात आले या मध्ये ते ठेवत असताना कुठलाच विचार हा करण्यात आला नाही .या मध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे भूतपूर्व सरपंच व ग्रामसेविका यांनी गावाचा पैसा व्यर्थ गमावला या मध्ये मागणी नुसार कार्यवाही न करता ग्रामसेवक यांनी महिला व प्रवासी तसेच शाळेतील मुले मुलीची कुचबना निर्माण केली आहे .
विशेषतः महिला प्रवाशांना स्वच्छतागृह वापरताना असुविधा व अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हे स्वच्छालय बावनबीर लगत रस्ताच्या एका विशिष्ट जागी एकांतात ठेवावे. संबधित विभागाने त्या ठिकाण वरील चालते फिरते स्वच्छालय हे लवकरात लवकर हलवण्यात यावे अशी गावकरी यांची मागणी आहे .
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेविका यांनी योग्य निर्णय न घेता गावाला विचारत घेतले नाही व सदस्य यांना सुधा विचारणा झाली नाही त्या मुळे जनतेच्या पैसेचा योग्य जागी गरजे नुसार उपयोग घ्यावा तसेच सार्वजनिक निधीतून खर्च करण्यात आलेल्या सुविधांचा योग्य नियोजनाने वापर होणे गरजेचे आहे. मात्र चुकीच्या नियोजनामुळे प्रवासी व महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने बस स्थानक परिसरात पर्यायी जागा उपलब्ध करून हे चालते-फिरते स्वच्छालय योग्य ठिकाणी हलवावे, अशी मागणी प्रवासी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अन्यथा या विषयावर ग्रामस्थांकडून पुढील आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
प्रतिक्रिया :- श्रीकांत झाल्टे (सामाजिक कार्यकर्ता )
उपोषण कर्ता च्या मागणी नुसार स्वच्छलय व्यवस्था न करता संबधित विभागाने थातूरमातूर कार्यवाही करत प्रवासी निवारा समोर चालते फिरते स्वच्छलय ठेवून महिला करिता मोठी कुचबुना निर्माण केली आहे .तरी जनतेचा पैसे खर्च करताना सरपंच व ग्रामसेविका यांनी अनेक निर्णय चुकीचे घेतली या मध्ये हि एक जनतेच्या पैसेची उधळन चा प्रकार आहे तरी संबधित विभागाने ति लवकरात लवकर सुधरावी



