अवैधरित्या दुचाकीवरून देशी दारूची वाहतूक ; सोनाळा पोलिसांची धडक कारवाई
एक लाख 57 हजार पाचशे रुपयांच्या मुद्देमालासह दोन आरोपी सोनाळा पोलिसांच्या जाळ्यात ....
(प्रभुदास पारस्कार) :-
युवा महाराष्ट्र11 न्युज
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस स्टेशन अंतर्गत अवैधरित्या दुचाकीवरून देशीदारूची वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सोनाळा पोलीसांनी तत्परतेने केलेल्या कारवाईत दोघांना ताब्यात घेत 1 लाख 57 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ठाणेदार संदीप काळे यांच्या मार्गदर्शनात पोहेकॉ विनोद शिंबरे व इतर पोलीस सहकारी यांनी ही कारवाई शुक्रवार 13 मार्च रोजी सकाळी 11:30 ते 12:00 वाजताच्या सुमारास दुनकी बु. ते वसाडी रस्त्यावरील मोतीलाल मोरे यांच्या घराजवळ सदर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी अक्षय चरणदास वर्गे वय 26 वर्ष व सागर किसन वर्गे वय 26 वर्ष दोघेही रा. करमोळा यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोहेकॉ विनोद शिंबरे यांनी पंचांसमक्ष पोलीस पथकासह छापा टाकला असता यावेळी सदर इसमाकडून एका पोत्यामध्ये 90 एमएल क्षमतेच्या टॅंगो पंच’ देशीदारूच्या एकूण 150 सिलबंद बाटल्या प्रत्येकी किंमत 50 रुपये असा एकुन 7 हजार 500 रुपयांचा अवैध दारूसाठा आढळून आला. सदर आरोपी अवैधरित्या दुचाकीवरून देशीदारूची वाहतूक करत असताना त्यांच्याकडून लाल रंगाची होंडा युनिकॉर्न कंपनीची दुचाकी क्र. एम.एच.28 बी एक्स 9981 जप्त करण्यात आली. या दुचाकीसह एकूण 1 लाख 57 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. पोहेकॉ विनोद शिंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कलम 65 (अ) व 83 अन्वये सोनाळा पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा क्रमांक 70/2026 दाखल करण्यात आला आहे. मा ठाणेदार संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोहेकॉ शाकीर पटेल करीत आहेत.



