Uncategorized

सोनाळा पोलीसांची टुनकी बसस्थानक परिसरात नाकाबंदी ; वाहतुक नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई…

ठाणेदार संदीप काळे यांचे शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत विशेष भर देत जनजागृती / मार्गदर्शन ..

युवा महाराष्ट्र11 न्यूज

(प्रभुदास पारस्कार )✍️

संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस स्टेशन अंतर्गत टुनकी बसस्थानक परिसरात पोलीस नाकाबंदी करून वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली .
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच वाहतूक नियमांचे पालन आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्यादृष्टीने सोनाळा पोलीस स्टेशन अंतर्गत टुनकी बसस्थानक परिसरात विशेष मोहीम राबविण्यात आली. ठाणेदार संदीप काळे यांनी सोनाळा पोस्टे पदभार सांभाळला आणि सुरक्षा व्यवस्था अबाधित राखणे व शालेय विद्यार्थ्यांचे सुरक्षेबाबत विशेष लक्ष देण्यात येत आहे . याच दृष्टिकोनातून ठाणेदार संदीप काळे यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवार दि. 13 जुलै रोजी विद्यालयीन वेळेत सकाळी 06:45 ते 09:00 या वेळेत टुनकी बसस्थानक परिसरात नाकाबंदी करण्यात आली. या वेळी शालेय विद्यार्थिनीच्या बाहेरगावच्या व गावातील विद्यार्थिनींच्या शाळेपर्यंतच्या प्रवासा दरम्यान सुरक्षेबाबत विद्यालयात भेट देऊन मार्गदर्शन तसेच या नाकाबंदी दरम्यान सदर कारवाई करण्यात आली त्यात मद्यप्राशन करून वाहन चालविणे एका वाहनचालकावर ड्रिंक अँड ड्राइव्ह अंतर्गत कारवाई करण्यात आली, तर मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या लहान मोठ्या 10 वाहनांवर /वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यानंतर पोलिसांनी आदिवासी विद्यालय, टुनकी येथे भेट देऊन विद्यार्थ्यांची ने-आन करणाऱ्या वाहनचालकांना वाहतुक सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधत, प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारे त्रास देने , पाठलाग करने किंवा छेडछाड करीत असल्यास किंवा इतर कोणाच्या दृष्टीक्षेपात आल्यास तात्काळ सोनाळा पोलीस स्टेशन, ”पोलीस काका” अथवा ”पोलीस दीदी” यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमशील मोहिमेतून वाहतूक नियमांचे पालन, विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि नागरिकांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा संदेश यावेळी सोनाळा पोलिसांनी दिला .

युवा महाराष्ट्र11न्युज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close