मिशन परिवर्तन अंतर्गत सोनाळा पोलीस स्टेशन यांच्यावतीने पोलीस भरती लेखी सराव परीक्षा…..

प्रभुदास पारस्कार ता विशेष प्र संग्रामपूर :-

👉 पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लेखी सराव परीक्षा ; सोनाळा पोस्टेचा स्तुत्य उपक्रम..
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस स्टेशन यांचे स्तुत्य उपक्रम मा. श्री निलेश तांबे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून मिशन परिवर्तन हि संकल्पना पूर्ण जिल्हाभर पोलीस दल राबवित असून या मिशन परिवर्तन अंतर्गत ठाणेदार मा. श्री संदीप काळे सोनाळा पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस भरतीसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम पोलीस भरती लेखी सराव परीक्षा 07 डिसेंबर 2025 रोजी आदिवासी कनिष्ठ कला महाविद्यालय टुनकी येथे आयोजीत करण्यात आली आहे . पोलीस भरती लेखी सराव परीक्षेत प्रथम द्वितीय आणि तृतीय पटकवणाऱ्या परीक्षार्थींनी आकर्षक बक्षीस वितरण करण्यात येईल तरी या पोलीस भरती लेखी सराव परीक्षेत जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी सहभागी होत या सराव परीक्षेचा फायदा घ्यावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संदीप काळे पोस्टे सोनाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे . रविवार दिनांक 7 डिसेंबर रोजी सकाळी 09 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे . परीक्षार्थींनी पो कॉ श्री तितरे मो नं 8975524557 यांच्याशी संपर्क साधावा जेणेकरून योग्य व्यवस्था करण्यात येईल असे आवाहन सोहळा गोष्टीच्या वतीने करण्यात आले आहे .



