
शाम बोरपी सोनाळा (प्रतिनिधी)
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सोनाळा येथे ग्रामपंचायत सोनाळा अंतर्गत भव्य अशी स्पर्धापरीक्षेचे ग्रंथालय युवा सरपंच हर्षल खंडेलवाल यांच्या पुढाकार घेऊन होतकरू स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करण्याकरिता एक सुसज्ज अशी नाविन्यपूर्ण स्पर्धा परीक्षा अभ्यासिका उभारली आहे.
स्पर्धा च्या युगामध्ये आपले गाव हे शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांसाठी तथा युवकांसाठी पाहिजे त्या प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध नसतात. युवकांनी स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातून आपले नाव व भविष्य उज्वल करण्याच्या हेतूने त्यांचे मनोबल व जिद्द असल्याचे पाहून सरपंच यांनी पुढाकार घेतला आहे . स्पर्धापरीक्षा ग्रंथालया मध्ये सपूर्ण साहित्य पुरवठा करण्याचे त्या ठिकाणी सांगितले या मध्ये आपल्या गावाचे वातावरण स्पर्धा युगात कसेसमोर नेता येईल या कढे त्यांनी लक्ष दिले .
अभ्यासासाठी आवश्यक असलेले वातावरण नसल्याकारणाने ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागाची विद्यार्थ्यांच्या तुलनेत मांगा राहतो. गावातील विद्यार्थी मागे न राहता तो स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हावा हाच उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून सोनाळा ग्रामपंचायत चे सरपंच हर्षल खंडेलवाल यांनी अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
सोनाळा ग्रामपंचायत चे सरपंच यांनी सुरु केलेल्या सुसज्ज इमारतीमध्ये किमान 25 ते 30 विद्यार्थी एकाच वेळी अभ्यास करतील अशी व्यवस्था करून दिली आहे. या अभ्यासिकेचे उद्घाटन होण्याअगोदर गावातील होत करू करू विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी भाड्याने खोली करून अभ्यास करीत असत. त्यांना पाहिजे तसे वातावरण आणि व्यवस्था त्या ठिकाणी नसल्याचे लक्षात आल्यानंतर सरपंच हर्षल खंडेलवाल यांच्या कल्पकतेतून ही अभ्यासिका साकारली आहे. या अभ्यासिकेचा विद्यार्थ्यांना निश्चितच चांगला फायदा होईल अशी अपेक्षा यावेळेस व्यक्त करण्यात आली. ही अभ्यासिका गावातील सर्व जाती-धर्मातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी असून आपण तिचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच हर्षल जी खंडेलवाल यांनी केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सोनाळा सरपंच हर्षल खंडेलवाल, प्रमुख मार्गदर्शक सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे तसेच प्रमुख अतिथी म्हणून सोनाळा केंद्राचे केंद्रप्रमुख भीमराव वानखडे ,ग्रामविकास अधिकारी कु. एस. आर. धोटकर,तंटामुक्ती अध्यक्ष महादेव चवरे, व युवकाचे मार्गदर्शक संतोष दाभाडे सर प्रामुख्याने उपस्थित होते. या मध्ये जे मुले स्पर्धा परीक्षा मध्ये यशस्वी झाले व नोकरीवर लागले त्यांचा सत्कार हा करण्यात याला या मध्ये शुभम बावणे धीरज भागवत ,मंगेश बाठे ,पवन गोतमारे ,विश्वजीत खांडेकर आणि महाराष्ट्र सुरक्षा बल मध्ये लागले त्यांचा व सिमा सुरक्षा बल मध्ये लागलेल्या मध्ये विवेक तायडे यांचा सत्कार हा करण्यात आला होता या कार्यक्रमा करिता गावातील अनेक युवक हे मोठ्या संख्येने हजर होती


