सोगोडा जिल्हा परिषद शाळेत परसबाग उपक्रमातून सेंद्रिय पालेभाज्यांचे उत्पादन…
परसबागेत पिकविलेल्या पालेभाज्या दाखवताना शाळेच्या विद्यार्थिनी


संग्रामपूर ता प्र प्रभुदास पारस्कार
संग्रामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा सोगोडा येथे विद्यार्थ्यांनी स्वकष्टाने एक सुंदर परसबागेत स्वच्छ हिरवीगार भाजीपाल्याची दर्जेदार उत्पन्न देणारी सेंद्रीय परसबाग फुलवून दाखवली आहे. विशेषतः म्हणजे या परसबागेत पिकवलेल्या विविध प्रकारच्या उत्तम दर्जेदार पालेभाज्या कोबी , टोमॅटो, पालक, वांगी, कोथिंबीर व मेथी अशा ताज्या आणि सेंद्रिय भाजीपाल्याचे उत्पादन केले जात आहे . शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे . या सेंद्रिय ताजेतवाने पालेभाज्यांचे शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठी दररोज उपयोग केला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पौष्टिक अन्न मिळण्यासोबतच स्वतः तयार केलेल्या पालेभाज्यांचा आनंदही मिळत आहे.
या उपक्रमामुळे मुलांना सेंद्रीय शेती व रासायनीक शेती यातील फरक तसेच शेतीपूरक अनुभव, नैसर्गिक शेतीचे महत्त्व आणि श्रमाची जाण प्राप्त होत आहे . परसबाग विकसित करण्यासाठी इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी मोठया उत्साहाने सहभाग नोंदवला असून वर्गशिक्षक श्री. एम. जी. राठोड सर व मदतनीस संतोष साटोटे यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच मुख्याध्यापक दाते सरांचे योग्य मार्गदर्शन लाभले . या उपक्रमामुळे शाळा परिसरात स्वच्छ, हिरवेगार आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले आहे. या उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .




