अण्णाभाऊ साठे नगरात तीव्र पाणीटंचाई; सार्वजनिक नळासाठी सोनाळा नागरिकांचे निवेदन, ‘मटका फोड’ आंदोलनाचा इशारा
बहुजन समाजाचे ग्रामपंचायत कार्यालयात घागर फोड आंदोलन इशारा

अनेक वर्षापासून आमच्या समाजाकडे ग्रामपंचायत सदस्य व सरपंचाचे दुर्लक्ष आहे तरी समस्यांचे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे तरी समस्येचे निवारण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमच्या समाजाच्या वतीने करण्यात आला आहे.
श्री.पुरणभाऊ तायडे (सामाजिक कार्यकर्ते )
सतिश वानखडे ( संग्रामपुर प्रतिनिधी )
सोनाळा ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक ३ मधील अण्णाभाऊ साठे नगर येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाला निवेदन देत तातडीने सार्वजनिक पाण्याचा 24 तास पाणी चालू नळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, उन्हाळ्याच्या काळात पाण्याची समस्या अधिकच तीव्र झाली असून महिलांना व लहान मुलांना दूरवर जाऊन पाणी आणावे लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर तसेच दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच, ग्रामपंचायतीमार्फत लवकरात लवकर सार्वजनिक पाण्याचा 24 तास पाणी चालू नळ (टॅप कनेक्शन) देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित विभागाणी या अर्जाची तत्काळ दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर ‘मटका फोड’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे या गंभीर पाणीटंचाईच्या प्रश्नावर प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


