Uncategorized

टुनकी बु. येथे ‘सन्मान मानवतेच ‘ यशाची भरारी गुणवंताचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न…

👉“नाव नाही, कीर्ती नाही... फक्त माणुसकीचा अखंड दीप!”निस्वार्थ "मानवता धर्म" समूहाची सामाजिक चळवळ..

युवा महाराष्ट्र11 न्युज (प्रभुदास पारस्कार)
👉“नाव नाही, कीर्ती नाही… फक्त माणुसकीचा अखंड दीप!”मानवता धर्म समूहाची सामाजिक चळवळ..

संग्रामपूर तालुक्यातील जि प मराठी शाळा टुनकी बु येथे 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी “सन्मान मानवतेचा” कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला .
बेघर, निराधार, अनाथ आणि उपेक्षित घटकांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या “मानवता धर्म” या सामाजिक चळवळ च्या वतीने आयोजित ‘सन्मान मानवतेचा’ हा प्रेरणादायी कार्यक्रम टूनकी बु. येथील जि. प. के. मराठी उच्च प्राथमिक शाळा प्रांगणात मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला .
सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विजयराव पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज , राजश्री शाहू महाराज ,महात्मा ज्योतिबा फुले व डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले .विशेषतः मान्यवरांचे पुष्पगुच्छ येवजी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कार्यक्रमाचे प्रमुख पाहणे श्री.विजयराव पाटील ,मार्गदर्शक ठाणेदार संदीप काळे व उपस्थित मान्यवरांचे वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी उपस्थितांनी कौतुकास्पद संदेश आत्मसात करत टाळ्यांच्या कडकडाटात या निर्णयाचे आणि मान्यवरांचे स्वागत केले .सदर कार्यक्रमाचा उद्देश
समाजातील गरजूंना मदतीचा हात देण्याच्या दृष्टीने सुरू झालेल्या या उपक्रमाने आज एक सामाजिक चळवळीचे स्वरूप धारण केले आहे. विशेष म्हणजे, या कार्याची सुरुवात करणाऱ्या युवकांनी स्वतःचे नाव कधीही पुढे न आणता “संपूर्ण गावच मानवता धर्माचे सदस्य आहे” ही भावना जपली. त्यामुळे या उपक्रमात गावातील दानशूर नागरिक, शाळा, महाविद्यालये, सामाजिक मंडळे, व्यापारी, शेतकरी आणि विविध क्षेत्रांतील व्यक्ती मोठ्या संख्येने सहभागी झाले .
कार्यक्रमात बेघर, बेसहारा आणि अनाथांसाठी जमा झालेल्या देणगीची पारदर्शक माहिती सर्वांसमोर सादर करण्यात आली . तसेच जमा झालेली देणगी रक्कम डॉ. विजयराव पाटील अध्यक्ष आत्मसन्मान फाउंडेशन, बोदवड यांना सर्वांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली. यावेळी समाजकार्यात योगदान देणाऱ्या दानशूर दात्यांचा सन्मान करण्यात आला .
याशिवाय मानवता धर्म समूहाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या “स्वैच्छीक रक्तदान शिबिर” मध्ये स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, तसेच शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक आणि इतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय वानखडे यांनी केले. त्यांनी मानवता धर्म उपक्रमाचा उद्देश, वाटचाल आणि समाजातील सकारात्मक परिणाम याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. डॉ. विजय पाटील, अध्यक्ष–आत्मसन्मान फाउंडेशन, बोदवड यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मानवता धर्म चळवळीचे तसेच संपूर्ण गावातील दानशूर दात्यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, “निराधारांच्या सेवेसाठी उभा राहणारा समाजच खऱ्या अर्थाने समृद्ध असतो. टूनकी बु. गावाने माणुसकीचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.”
यावेळी इतर मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मेंद्र इंगळे ,प्रास्ताविक संजय वानखडे तर प्राचार्य रामदास पारस्कर सर यांनी आभार प्रदर्शन पर मनोगत व्यक्त करत मानवता धर्मच्या कार्याचे कौतुक केले आणि मातृत्व व दातृत्व यातील डॉ.विजयराव पाटील यांनी बेगर अनाथ मनोरुग्णांची सेवा करत दातृत्वाची जबाबदारी सांभाळत आहेत . तसेच मानवता धर्म समूहाची ही चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमात सर्वत्र “माणूसकी हाच खरा धर्म, सेवा हाच खरा ईश्वर” हा संदेश अधोरेखित झाला. संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रत्यय देणाऱ्या या उपक्रमाने समाजातील एकोपा, संवेदनशीलता आणि निस्वार्थ सेवेची जाणीव अधिक दृढ केली.
मानवता धर्म ही कोणाची संस्था किंवा मालकी नसून एक विचार, एक संस्कार आणि समाजाला जोडणारी जिवंत चळवळ आहे. समाजात जोपर्यंत गरजू, उपेक्षित आणि दु:खी माणसे आहेत, तोपर्यंत मानवतेचा हा दीप असाच तेवत राहील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी डॉ.सुरेंद्र तोमर, श्री.चरणसिंग पाटील , माजी सरपंच श्री. राजेंद्र वानखडे , श्री.शंकरराव तिडके , श्री.मुरलीधर जामोदे,प्राचार्य रामदास पारस्कर , श्री.सुरेंद्र बेंदरकार , श्री दशरथ भाऊ लोणकर, जेष्ठ शिक्षक संजय दामधर सर,मुख्याध्यापक साजिद रजा पठाण , श्री.निलेश पवार सर व श्री. रविंद्र चाटे सर आदी उपस्थित होते

माजी शिक्षक अताऊल्ला खा पठाण सर यांनी शब्दातून केले कौतुक…

शेवटी एवढंच की –
📒न कोई नाम चाहिए, न कोई पहचान चाहिए,
बस किसी बेबस के चेहरे पर मुस्कान चाहिए।

जो आँसू पोंछ दे किसी के, वही असली फ़क़ीर है,
मुहब्बत बाँटना ही “मानवता धर्म” की तासीर है।

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 37;

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close