व्हाईस ऑफ मीडिया संग्रामपूर शाखेच्या वतीने 11 जानेवारी ला वरवट (ब ) येथे भव्य हृदय रोग तपासणी शिबिराचे आयोजन
श्री संत अच्युत महाराज हार्ड हॉस्पिटल अमरावती व व्हाईस ऑफ मीडिया संग्रामपूर यांच्या सौजन्याने मधुमेह रक्तदाब व हृदय निदान शिबिर

संग्रामपूर प्रतिनिधी प्रभुदास पारस्कार :-
श्री संत अच्युत महाराज हॉर्ट हॉस्पिटल अमरावती व व्हाईस ऑफ मिडिया ता. संग्रामपूर ह्यांच्या संयुक्त विद्यमाने वरवट (बकाल) येथे जेष्ठ पत्रकार भाऊ भोजने यांच्या निवास स्थानी दि 11 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता हृदय रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन मधुमेह रक्तदाब व हृदय तपासणी श्री संत अच्युत महाराज हॉर्ट हॉस्पिटल अमरावतीचे तज्ञ डॉक्टरांन कडून केली जाणार आहे . कोरोना काळानंतर हृदय रोगीमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून मधूमेहाचा त्रास आबाल वृद्धापासून सर्वांना त्रास सहन करावा लागत आहे. ह्या हृदय रोगाचे पुर्वनिदान केले तर जीवावरचे संकट टाळणे शक्य तसेच आरोग्य अबाधित राहण्यास मदत होऊ शकते परिसरातील नागरीकांच्या आरोग्य तपासणी साठी या शिबीरात मधुमेह रक्तादाब व इसिजी निशुल्क तपासणी करण्यात येणार त्यानंतर तज्ञांच्या सल्ल्यानुसार एन्जिओग्राफी अन्जिओप्लास्टी व ओपन हार्ट सर्जरी शासकीय योजने अंतर्गत श्रीसंत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल अमरावती येथे करण्यात येईल तरी गरजू हृदयरोग नागरीकांनी ह्या संधीचा लाभघेण्यासाठी श्रीराम मेडिकल स्टोअर्स, नागेश्वर मेडिकल स्टोअर्स, ओम जेनरिक मेडिकल स्टोअर्स वरवट श्री हास्पीटल वरवट बकाल यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान व्हॉईस मिडीयाचे भाऊ भोजने, प्रल्हाद दातार काशीनाथ मानकर , किशोर खडे, मिर मकसूद अली, सुचीत धनभर, नारायण सावतकार, रवि सिरस्कार दयालसिंग चव्हाण, प्रभु पारस्कार , विठ्ठल निंबोळकर , साबीर खान, डॉसमीर शेख, अशोक आकोटकार, संतोषदेऊकार, संतोष आगलावे यांनी केले आहे .



