Uncategorized

सोनाळा वन्यजीव वनविभागाने केले दुर्मिळ गिधाड पक्षाचे रेस्क्यू

वैद्यकीय तपासणीनंतर सुखरूप असल्याने संशोधन केंद्र सोमठाणा येथे दाखल

गिधाड पक्षाच्या पायातील टॅगिंग क्रमांकाचे निरीक्षण करताना सोनाळा वन्यजीव कर्मचारी

संग्रामपूर प्रतिनीधी

प्रभुदास पारस्कार : –

संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा परिसरात बुधवार 14 जानेवारी रोजी दुपारी दुर्मिळ असलेल्य गिधाड जातीच्या पक्ष्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. सोनाळा परिसरातील गावभोवती गिधाड जातीचा दुर्मिळ पक्षी आकाशात गिरट्या मारत असल्याच्या घटनेची माहिती मिळताच वन्यजीव विभाग सोनाळा व पशुवैदकीय विभाग यांना मिळताच तात्काळ कारवाई करत मोठ्या चतुराईने सदर गिधाडाचे सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले. रेस्क्यू केल्यानंतर गिधाडास पशुवैदकीय दवाखाना सोनाळा येथे दाखल करून सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणी केल्यावर त्या गिधाड पक्ष्यावर E96 व M89 असे टॅगिंग क्रमांक असल्याचे निदर्शनास आले. पशुवैदकीय अधिकारी डॉ.प्रमोद जाधव यांनी गिधाडाची प्रकृती पूर्णपणे ठणठणीत व सुरक्षीत असल्याचे स्पष्ट केले. ही संपूर्ण कारवाई मा. श्री राहुलसिंह तोलिया उपवनसंरक्षक अकोट , मा. श्री गणेश टेकाडे सहाय्यक वनसंरक्षक अकोट, मा. श्री अजय बावणे वन परिक्षेत्र अधिकारी सोनाळा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सदर रेस्क्यू मोहिमेत कपिल मोरे वनरक्षक सालवन बिट , पी. ए. जगरवाल वनरक्षक पिंगळी बिट , एन. वाय. पळसपगार सोनाळा परिक्षेत्र, चेतनजी वर्मा वन्यजीव प्रेमी, सुनील सखाराम खिराळे, आरिफ केदार, सुमित भास्कर वनसेवक तसेच सूर्या सूत गिधाड पर्यवेक्षक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तपासणीनंतर सदर गिधाडास पुढील निरीक्षण व संवर्धनासाठी सोमठाणा येथील गिधाड संशोधन केंद्रात सुरक्षितपणे रवाना करण्यात आले. वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने ही कारवाई उल्लेखनीय ठरत असून वनविभागाच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close